🕒 1 min read
पुणे: दातदुखी सुरू झाली की कोणत्याही कामात लक्ष लागत नाही. कधीकधी या वेदना इतक्या वाढतात की डोकेही दुखायला लागते, चेहऱ्यावर सूज येते आणि अक्षरशः जीव कासावीस होतो. दातदुखीची ( Toothache Remedies ) अनेक कारणे असू शकतात – कधी जेवताना काहीतरी अडकणे, तर कधी दाताला कीड लागणे किंवा गरम-थंड पदार्थांमुळे होणारी संवेदनशीलता. अशा वेळी, डॉक्टरांकडे जाण्यापूर्वी काही सोपे घरगुती उपाय करून पाहणे नक्कीच फायदेशीर ठरते. जर या उपायांनी आराम मिळाला नाही, तर मात्र लगेच डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.
Toothache Home Remedies
अकरकरा: दातदुखीसाठी अकरकरा अत्यंत फायदेशीर मानला जातो. सकाळी उठल्यावर अकरकराचे फूल चावल्याने तोंड स्वच्छ होते. तुम्ही अकरकराची पावडर बनवून त्यात तुरटी आणि लवंग मिसळून नैसर्गिक टूथपेस्ट तयार करू शकता. या टूथपेस्टच्या नियमित वापराने दातांच्या अनेक समस्या दूर होतात.
कोमट पाणी आणि मीठ: दात दुखत असल्यास, कोमट पाण्यात मीठ घालून गुळण्या करा. यामुळे केवळ वेदना कमी होत नाहीत, तर दातांमध्ये अडकलेले अन्नकण किंवा इतर गोष्टी बाहेर पडण्यास मदत होते. मीठ जंतुनाशक म्हणून काम करते, ज्यामुळे दातांमध्ये जमा झालेले जंतू मरतात आणि नसांमधील वेदना कमी होतात.
लवंग: तीव्र दातदुखीसाठी लवंग हा एक पारंपरिक आणि प्रभावी उपाय आहे. दुखणाऱ्या दाताखाली एक अख्खी लवंग ठेवा आणि ती हळूहळू दाताने दाबा. लवंगचा रस दातामध्ये उतरल्याने वेदना कमी होण्यास मदत होईल. लवंगमध्ये नैसर्गिक ॲनाल्जेसिक (वेदना कमी करणारे) गुणधर्म असतात.
लसूण: दातदुखी कमी करण्यासाठी लसणाचा वापरही करता येतो. दुखणाऱ्या दाताखाली लसणाची एक पाकळी ठेवून हळूवारपणे चावा. लसणामध्ये असलेले ॲलिसिन (Allicin) नावाचे संयुग वेदनाशामक आणि जंतुनाशक म्हणून काम करते. याव्यतिरिक्त, तुम्ही हळद, मीठ आणि राईच्या तेलाची पेस्ट बनवून दुखणाऱ्या दातावर लावू शकता. हळद आणि मीठ हे दोन्ही नैसर्गिक जंतुनाशक आहेत.
या उपायांनी तुम्हाला तात्पुरता आराम मिळू शकतो. मात्र, दातदुखी ( Toothache Remedies ) जर वारंवार होत असेल किंवा तीव्र स्वरूपाची असेल, तर कोणत्याही घरगुती उपायांवर अवलंबून न राहता त्वरित दंतवैद्याचा सल्ला घेणे महत्त्वाचे आहे, कारण दातदुखी हे एखाद्या गंभीर समस्येचे लक्षण असू शकते.
📌 महत्वाच्या बातम्या
- विदेशी मद्य उद्योगाला परवान्यांची खैरात? मंत्रिमंडळात खळबळ, ‘लाडकी बहिण’ योजनेमुळे तिजोरीत खडखडाट!
- भरवर्गात शिक्षिकेचा विद्यार्थिनींसह ‘वाका वाका’ डान्स! VIDEO पाहून नेटकरी म्हणाले, ‘आमच्या वेळी अशा शिक्षिका…’
- पैसाच पैसा! म्हातारपणात टेन्शन फ्री राहायचंय? आजच उघडा ‘हे’ अकाउंट, जाणून घ्या संपूर्ण माहिती!
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now









