प्रतिनिधी, 1 नोव्हेंबर: महिला व बाल विकास विभागाकडून राबवण्यात येणाऱ्या ‘लेक लाडकी’ योजनेच्या प्रक्रियेत मोठा बदल करण्यात आला आहे. मुलींच्या शिक्षणाला प्रोत्साहन देण्यासाठी आणि त्यांच्या सक्षमीकरणासाठी सुरू असलेल्या या योजनेसाठी आता ‘महाडीबीटी २.०’ पोर्टलवरून थेट ऑनलाइन अर्ज करता येणार असल्याची माहिती महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिली आहे.
यापूर्वी लाभार्थ्यांना जवळच्या अंगणवाडी केंद्रात जाऊन अर्ज जमा करावे लागत होते. त्यानंतर प्रकल्प स्तरावर या अर्जांची जुन्या पोर्टलवर नोंदणी केली जात असे. मात्र, आता ऑनलाइन प्रणालीमुळे कागदपत्रांची अट शिथिल करण्यात आली असून, अर्जाची नोंदणी करण्यापासून ते त्याचे स्टेटस पाहण्यापर्यंतची संपूर्ण प्रक्रिया ऑनलाइन झाली आहे.
या योजनेचा लाभ १ एप्रिल २०२३ रोजी किंवा त्यानंतर जन्मलेल्या मुलींना मिळतो. मुलीच्या जन्मानंतर ५ हजार रुपये, पहिलीत प्रवेश घेतल्यावर ६ हजार, सहावीत गेल्यावर ७ हजार, तर अकरावीत प्रवेशावेळी ८ हजार रुपये दिले जातात. मुलगी १८ वर्षांची झाल्यानंतर तिला ७५ हजार रुपये मिळतात. अशा प्रकारे टप्प्याटप्प्याने एकूण १ लाख १ हजार रुपयांची आर्थिक मदत दिली जाते.
या योजनेसाठी अर्ज करणारे कुटुंब महाराष्ट्राचे रहिवासी असणे बंधनकारक आहे. तसेच त्यांच्याकडे पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड असणे आणि शासनाच्या उत्पन्न व इतर पात्रता अटींची पूर्तता करणे आवश्यक आहे. आतापर्यंत राज्यातील २ लाख ९८ हजार ६९५ लाभार्थ्यांना या योजनेअंतर्गत पहिला लाभ देण्यात आला आहे.
📌 महत्वाच्या बातम्या
- दारूच्या प्रत्येक बाटलीवर १० रुपये अतिरिक्त आकारणार; रिकामी बाटली दिल्यास मिळणार परतावा
- बांगलादेश विरुद्ध वेस्ट इंडिज कसोटीनंतरची WTC गुणतालिका: वेस्ट इंडिजचा ८ गडी राखून विजय
- ८७ धावांच्या पराभवानंतर भुवनेश्वर कुमारला वगळण्यावरून मोहम्मद कैफची भारतीय संघावर टीका
Ask Maharashtra Desha
आधी या वेबसाइटवरील उपलब्ध बातम्यांमधून उत्तर शोधले जाईल. माहिती अपुरी असल्यास वेबवरील अतिरिक्त स्रोत तपासले जातील.









