🕒 1 min read
Sanjay Raut । ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत सतत राज्य आणि केंद्र सरकारला विविध मुद्द्यांवरून टार्गेट करत असतात. राज्यात सध्या महायुतीमध्ये पालकमंत्रीपदावरून धुसफूस सुरु आहे. यावरून राऊत यांनी मोठं वक्तव्य केले आहे.
“पालकमंत्रीपदासाठी लढाई हे अतिशय बिनडोकपणाचे लक्षण असून यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हतबल झाले आहेत. फडणवीस परदेशात असताना दिल्लीतून दबाव आणून पालकमंत्रीपदावर स्थगिती आणली आहे. हा त्यांचा मोठा अपमान आहे”, असे वक्तव्य संजय राऊत यांनी केले आहे.
दरम्यान, रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदी आदिती तटकरे (Aditi Tatkare) यांची निवड झाल्यानंतर भरत गोगावले समर्थक आक्रमक झाले तर नाशिकमध्ये देखील दादा भुसे (Dada Bhuse) यांचे समर्थक नाराज झाले होते. यानंतर नाशिक आणि रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्रिपद निवडीला स्थगिती दिली आहे. यावरून राऊत यांनी गंभीर आरोप केले आहे.
Sanjay Raut on Devendra Fadnavis
संजय राऊत यांच्या आरोपामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. खरोखरच देवेंद्र फडणवीस परदेशात असताना मोठी खेळी खेळली गेली का? आणि दिल्लीतून दबाव टाकून पालकमंत्रीपदावर स्थगिती आणली का? अशा चर्चांना देखील राजकीय वर्तुळात उधाण आले आहे.
महत्त्वाच्या बातम्या :
- 10 हजारांपेक्षा स्वस्तात खरेदी करा Vivo चा ‘हा’ जबरदस्त 5G फोन, पहा संपूर्ण ऑफर
- Weight Loss। झटपट वजन कमी करायचंय? ‘हे’ बियाणे ठरेल फायदेशीर
- खळबळजनक! Walmik Karad ला मिळाली रुग्णालयात व्हीआयपी ट्रीटमेंट, एकट्यासाठी 11 बेड…
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now










