Weight Loss । हल्ली अनेकजण वाढत्या वजनामुळे हैराण आहेत. अनेक उपाय करूनही अनेकांचे वाढलेले वजन (Weight) कमी होत नाही. यामुळे अनेक आजारांना आपण निमंत्रण देतो. जर तुम्हीही वाढत्या वजनामुळे हैराण असाल तर काळजी करू नका. कारण तुम्ही आता एका बियाण्याच्या मदतीने तुमचे वाढलेले वजन कमी करू शकता. कसे ते जाणून घ्या. (Weight Loss tips)
जवसाचे बियाणे (Flaxseed) तुमचे वाढलेले वजन कमी करू शकते. दिसायला जवसाचे बियाणे खूपच लहान असतात, परंतु ते सुपरफूडपेक्षा कमी नाहीत. शरीराच्या विकासासाठी ते खुप महत्त्वाचे आहे. या बियाण्यांमध्ये बर्याच पोषकद्रव्ये आढळतात ज्यामुळे शरीराला प्रत्येक प्रकारे फायदा होऊ शकतो. हे बियाणे फायबर, ओमेगा -3 फॅटीऍसिड, निरोगी प्रथिने, फिनोलिक कंपाऊंड आणि खनिजांचे समृद्ध स्त्रोत आहेत. दैनंदिन जीवनात तुम्ही या बियाणांचा सहजपणे समाविष्ट करता येईल.
अशाप्रकारे होईल वजन कमी
जवसाचे बियाणे आपल्याला बर्याच रोगांमध्ये मदत करू शकतात, परंतु वाढत्या वजन कमी करण्याचा विचार करत असाल तर ते आपल्यासाठी खूप उपयुक्त ठरू शकते. यामुळे चरबी आणि कंबर कमी होते. कारण या बियाण्यांमध्ये वजन कमी करण्याचे पोषकद्रव्ये आढळतात.
Flaxseed Benefits
जर तुम्हाला तुमचे वजन कमी करायचे असेल तर एक चमचा जवस, एक चमचा लिंबाचा रस, एक चमचा गूळ घ्या. कढईत एक चमचा जवस एक ग्लास पाण्यात उकळत ठेवा. दहा मिनिटांनी गॅस बंद करा आणि चव वाढवण्यासाठी यात एक चमचा लिंबाचा रस आणि गूळ मिक्स करावा. हे मिश्रण थोडा वेळ थंड होऊ द्या आणि प्या. हे खास पेय आपण रिकाम्या पोटी घ्या. यामुळे वजन झटपट कमी होते.
टीप: वरील माहिती लागू करण्यापूर्वी संबंधित तज्ञाचा सल्ला घ्या.
महत्त्वाच्या बातम्या :