Health Tips | आयुष्यभर निरोगी राहायचं असेल तर सकाळी रिकाम्या पोटी करा ‘या’ गोष्टींचे सेवन

Health Tips | टीम महाराष्ट्र देशा: आजकालच्या व्यस्त जीवनशैलीमुळे आणि खाण्यापिण्याच्या अयोग्य सवयींमुळे अनेकांना बहुतांश समस्यांना तोंड द्यावे लागते.

वेळेवर न खाल्ल्या-पिल्यामुळे अनेक गंभीर आजार होतात. या आजारांमुळे लोकांना आयुष्यभर केमिकल युक्त औषधांचं सेवन करावं लागतं.

अशात या सर्व समस्या टाळण्यासाठी तुम्ही सकाळी रिकाम्या पोटी काही गोष्टींचे सेवन करू शकतात. या गोष्टींचे सेवन केल्याने तुम्ही निरोगी आणि तंदुरुस्त ( Health Tips ) राहू शकतात.

त्याचबरोबर सकाळी रिकाम्या पोटी या गोष्टींचे सेवन केल्याने तुम्ही अनेक आजारांपासून दूर राहू शकतात. निरोगी राहण्यासाठी तुम्ही सकाळी रिकाम्या पोटी खालील गोष्टींचे सेवन करू शकतात.

ज्यूस ( Juice-Health Tips )

निरोगी आणि तंदुरुस्त राहण्यासाठी ( Health Tips ) तुम्ही सकाळी उठल्यावर रिकाम्या पोटी ज्यूसचे सेवन करू शकतात. ज्यूस प्यायल्याने शरीरातील विषारी पदार्थ बाहेर पडण्यास मदत होते.

सकाळी रिकाम्या पोटी तुम्ही काकडी, बीटरूट किंवा टोमॅटोच्या ज्यूसचे सेवन करू शकतात. नियमित याचे सेवन केल्याने शरीराला खूप फायदे मिळतात. त्याचबरोबर याच्या सेवनाने त्वचा आणि केस निरोगी राहण्यास मदत होते.

बडीशेपचे पाणी ( Fennel water-Health Tips )

तुम्ही जर वाढत्या वजनाच्या समस्येपासून त्रस्त असाल तर सकाळी रिकाम्या पोटी बडीशेपेचे पाणी पिणे तुमच्यासाठी अत्यंत उपयुक्त ( Health Tips ) ठरू शकते.

सकाळी रिकाम्या पोटी हे पाणी प्यायल्याने मेटाबोलिझम वाढते, परिणामी वजन कमी होण्यास मदत होते. त्याचबरोबर नियमित सकाळी बडीशेपेच्या पाण्याचे सेवन केल्याने तुम्ही गॅस, अपचन, बद्धकोष्टता, ऍसिडिटी इत्यादी समस्यांपासून दूर राहू शकतात.

पपई  ( Papaya-Health Tips )

पचनक्रिया निरोगी ठेवण्यासाठी पपई अत्यंत उपयुक्त ( Health Tips ) मानले जाते. सकाळी रिकाम्या पोटी पपईचे सेवन केल्याने पोटाशी संबंधित अनेक समस्या सहज दूर होतात.

पपईमध्ये भरपूर प्रमाणात अँटिऑक्सिडंट गुणधर्म आणि विटामिन सी आढळून येते, जे रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यास मदत करते. त्यामुळे सर्दी, खोकला इत्यादी आजार टाळण्यासाठी तुम्ही नियमित सकाळी रिकाम्या पोटी पपईचे सेवन करू शकतात.

भिजवलेले मनुका  ( Soaked raisins-Health Tips )

नियमित सकाळी रिकाम्या पोटी भिजवलेल्या मनुकांचे सेवन करणे आरोग्यासाठी खूप फायदेशीर ( Health Tips ) ठरू शकते.

याचे सेवन केल्याने पचनशक्ती वाढते. त्याचबरोबर यामध्ये आढळणारे पोषक घटक पोटाचे आजार दूर करण्यास मदत करतात. त्यामुळे निरोगी आणि तंदुरुस्त राहण्यासाठी तुम्ही दररोज सकाळी भिजवलेल्या मनुकांचे सेवन करू शकतात.

टीप: वरील माहिती लागू करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्या.

महत्वाच्या बातम्या

 

कृपया जाहिरातींना अनुमती द्या

तुम्ही जाहिरात ब्लॉकर वापरत आहात असे दिसते. आमच्या साइटला आर्थिक मदत मिळवण्यासाठी आम्ही जाहिरातींवर अवलंबून असतो. कृपया जाहिरातींना अनुमती द्या.