Dry Fruits Ball | मुलांना दररोज खायला द्या एक सुख्यामेवाचा एनर्जी बॉल; कसे करायचे? जाणून घ्या

Dry Fruits Ball | टीम महाराष्ट्र देशा: आजकालची लहान मुलं जेवणाला खूप कंटाळा करत असतात. ऐन जेवणाच्या वेळी काहीतरी कारण शोधून ते टाळाटाळ करत असतात.

अशात मुलांच्या शरीराला योग्य पोषण मिळत नाही. परिणामी ते आजारी पडतात. या समस्या टाळण्यासाठी तुम्ही मुलांना ड्रायफ्रूट्स एनर्जी बॉल ( Dry Fruits Ball ) बनवून खाऊ घालू शकतात.

मुलांनी याचे सेवन केल्याने त्यांना पूरक पोषण मिळू शकते. ड्रायफ्रूट बॉलमध्ये खजूर, बदाम, मनुका इत्यादी गोष्टी आढळून येतात.

या सर्व गोष्टींमध्ये भरपूर प्रमाणात जीवनसत्व खनिजे, लोह, अँटिऑक्सिडंट, कॅल्शियम इत्यादी पोषक घटक आढळून येतात, जे मुलांना निरोगी ठेवण्यास मदत करतात.

How to make Dry Fruits Balls?

ड्रायफ्रूट्सचा एनर्जी बॉल  ( Dry Fruits Ball ) बनवण्यासाठी तुम्हाला सर्वप्रथम बदाम तव्यावर चांगले भाजून घ्यावे लागतील.

बदाम थंड झाल्यानंतर तुम्हाला ते बारीक करून घ्यावे लागतील. त्यानंतर तुम्हाला मनुके मिक्सरमधून बारीक करून तव्यावर तूप लावून ते थोडेसे भाजून घ्यावे लागेल.

मनुक्यासह तुम्हाला खजुराची पावडर देखील तव्यावर भाजून घ्यावी लागेल. त्यानंतर खजूर, बदाम आणि मनुका पावडर तुम्हाला एकत्र मिसळून, त्यामध्ये आवश्यकतेनुसार तूप घालावे लागेल.

त्यानंतर तुम्हाला याचे छोटे छोटे लाडू प्रमाणे गोळे तयार करून घ्यावे लागेल. हे ड्रायफ्रूट एनर्जी बॉल  ( Dry Fruits Ball ) तुम्ही मुलांना दररोज खायला देऊ शकतात.

Dry Fruits Balls Benefits 

ड्रायफ्रूट्समध्ये  ( Dry Fruits Ball ) भरपूर प्रमाणात खजिने, अँटिऑक्सिडंट, फायबर आणि आयरन आढळून येतात, त्यामुळे मुलांना ड्रायफ्रूट बॉल खायला दिल्याने ते अनेक आजारांपासून दूर राहू शकतात.

नियमित याचे  ( Dry Fruits Ball ) सेवन केल्याने शरीरातील रक्त वाढण्यास मदत होते, त्याचबरोबर मेंदूचा चांगला विकास होतो.

नियमित ड्रायफ्रूटबॉल  ( Dry Fruits Ball ) खाल्ल्याने हाडे मजबूत होण्यास मजबूत होते. कारण ड्रायफ्रूट्समध्ये आढळणारे कॅल्शियम, मॅग्नेशियम, विटामिन ई हाडे मजबूत करण्यास मदत करतात.

टीप: वरील माहिती लागू करण्यापूर्वी संबंधित तज्ञाचा सल्ला घ्या

महत्वाच्या बातम्या

 

कृपया जाहिरातींना अनुमती द्या

तुम्ही जाहिरात ब्लॉकर वापरत आहात असे दिसते. आमच्या साइटला आर्थिक मदत मिळवण्यासाठी आम्ही जाहिरातींवर अवलंबून असतो. कृपया जाहिरातींना अनुमती द्या.