Sanjay Shirsat | शिंदे गटाचा CM शिंदेंना डच्चू? बावनकुळेंच्या विधानाला संजय शिरसाटांचा दुजोरा

Sanjay Shirsat | टीम महाराष्ट्र देशा: काल भंडाऱ्यामध्ये भारतीय जनता पक्षाची बैठक पार पडली. या बैठकीमध्ये बोलत असताना चंद्रशेखर बावनकुळे ( Chandrashekhar Bawankule ) यांनी देवेंद्र फडणवीस ( Devendra Fadnavis ) यांना मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत उतरवण्याचा निर्धार केला.

अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांचं नाव मुख्यमंत्री पदासाठी चर्चेत असताना चंद्रशेखर बावनकुळे यांनी देवेंद्र फडणवीस यांचं नाव घेतलं आहे

याच पार्श्वभूमीवर शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट ( Sanjay Shirsat ) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. यावेळी बोलत असताना शिरसाट  Sanjay Shirsat ) यांनी बावनकुळे यांच्या वक्तव्याला दुजोरा दिला असल्याचं दिसून आलं आहे.

Who will take oath as Chief Minister in Maharashtra?

माध्यमांशी संवाद साधत असताना संजय शिरसाट  ( Sanjay Shirsat ) म्हणाले, “कार्यकर्त्यांना हिम्मत आणि जोश देणं, हे पक्षाच्या नेतृत्वाचं काम असतं.

चंद्रशेखर बावनकुळे भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष असल्यामुळे पक्ष वाढवण्यासाठी ज्या गोष्टी कराव्या लागतात, त्यातील ही एक गोष्ट त्यांनी केली आहे.

चार राज्यामध्ये निवडणुका झाल्या आहेत. त्या ठिकाणी मुख्यमंत्री कोण होणार? याबाबत अद्याप स्पष्टता नाही. मुख्यमंत्री कोण होणार? हे ठरवणारे आहेत. त्याचबरोबर महाराष्ट्रामध्ये मुख्यमंत्री पदाची शपथ कोण घेईल? हे वेळ येईल तेव्हा समजेल.”

आमचाच मुख्यमंत्री होईल असं भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे म्हणत असतात. यावर बोलताना संजय शिरसाट  ( Sanjay Shirsat ) म्हणाले, “आमचा मुख्यमंत्री होणार, असं म्हणणं म्हणजे काही गैर नाही. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष देखील अजित पवार ( Ajit Pawar ) मुख्यमंत्री होणार असल्याचं म्हणतात.

त्याचबरोबर भाजप देखील म्हणत असतो, देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होणार. तर आम्ही ( Sanjay Shirsat ) म्हणत असतो आमचे मुख्यमंत्री कायम राहतील.

आम्ही सगळ्यांनी काहीही म्हटलं तरी विधानसभा निवडणुकानंतर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री कोण होईल? हे ठरेल. निवडणुकानंतर मुख्यमंत्री कोणाला करायचं? हे सर्व वरिष्ठ नेते ठरवतील. मात्र, युतीमध्ये वाद होईल असे वक्तव्य कोणीही करू नये.”

महत्वाच्या बातम्या 

 

कृपया जाहिरातींना अनुमती द्या

तुम्ही जाहिरात ब्लॉकर वापरत आहात असे दिसते. आमच्या साइटला आर्थिक मदत मिळवण्यासाठी आम्ही जाहिरातींवर अवलंबून असतो. कृपया जाहिरातींना अनुमती द्या.