Ajit Pawar | सत्ता संघर्षाबाबत सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयावर अजित पवार म्हणाले, “तारीख पे तारीख…”

Ajit Pawar | पुणे : खरी शिवसेना कोणाची? यावर गेल्या 6 महिन्यांपासून सत्तासंघर्ष दिसून येत आहे. या सत्तासंघर्षावर सुनावणी आज सुप्रीम कोर्टात (supreme court) पार पडली. सर्वोच्च न्यायालयात शिवसेनेच्या ठाकरे गटाने सात सदस्यांच्या घटनापीठाकडे हे प्रकरण देण्याची मागणी केली. ठाकरे गटाचे वकील कपिल सिब्बल यांनी ही मागणी केली.

यावेळी न्यायालयाने ही सुनावणी १४ फेब्रवारी रोजी घेण्याचा निर्णय दिला आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयावर राजकीय वर्तुळातून विविध प्रतिक्रिया उमटत आहेत. विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनीही यावर प्रतिक्रिया दिली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसची बैठक पार पडल्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयावर प्रतिक्रिया देताना अजित पवार म्हणाले, “तारीख पे तारीख तो होने वाली है. तो त्यांचा अधिकार आहे. न्यायव्यवस्थेला कोणी, तुम्ही-आम्ही विचारू शकतो का?, त्यांना(शिवसेनेला) जो अधिकार आहे तो अधिकार ते वापरणार.”

पुढे ते म्हणाले, “आम्हीपण बघतोय सारख्या तारखा सुरू आहेत. जवळपास सहा महिने झाले तारखा सुरू आहेत. आता पुन्हा फेब्रुवारीची तारीख दिलेली आहे.” दरम्यान, न्यायालयाच्या या सुनावणीवर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे. व्हॅलेंटाईन डे दिवशी सुनावणी असल्याने सर्वकाही प्रेमाने होईल, असं संजय राऊत म्हणालेत.

महत्वाच्या बातम्या :