Dhangar Reservation | कोल्हापुरात धनगर समाज आक्रमक; केली ST कोट्यातून आरक्षणाची मागणी

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Dhangar Reservation | कोल्हापूर: राज्यामध्ये मराठा समाज आरक्षणासाठी आंदोलन करत आहे. मराठ्यांनंतर धनगर समाजाने देखील आरक्षणाची ( Dhangar Reservation ) मागणी केली आहे.

याच पार्श्वभूमीवर धनगर समाज आक्रमक झाला असून जागोजागी आंदोलन ( Dhangar Reservation ) करताना दिसत आहे. या मुद्द्यावरून धनगर समाजाचं कोल्हापुरात मोठं आंदोलन झालं.

Dhangar community protested in Kolhapur

मराठा समाजानंतर आरक्षणाच्या ( Dhangar Reservation ) मुद्द्यावरून धनगर समाज देखील आक्रमक झाला आहे. याच पार्श्वभूमीवर धनगर समाजाचं कोल्हापूरच्या दसरा चौकात मोठं आंदोलन झालं.

धनगर समाजाने ST कोट्यातून आरक्षणाची ( Dhangar Reservation ) मागणी केली आहे. “तीन महिने झाले तरी सरकार धनगर समाजाच्या आरक्षणाचा ( Dhangar Reservation ) विषय गांभीर्याने घेत नाहीये.

सरकार फक्त वेळ काढूपणा करत आहे. सरकार कोणत्याही प्रकारचा अभ्यास वगैरे करत नाही. अशात धनगर समाज जागा झाला आहे.

त्यामुळं येत्या निवडणुकीत धनगर समाज त्यांना त्यांची जागा दाखवून देणार आहे”, असं एका धनगर आंदोलकांने म्हटलं आहे.

दरम्यान, मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण द्या, अशी मागणी मराठा समाजाने केली आहे. त्यांच्या या मागणीला ओबीसी समाजाने विरोध दर्शवला आहे. त्यानंतर ओबीसी समाज देखील रस्त्यावर उतरला आहे.

एकीकडे आरक्षणावरून मराठा आणि ओबीसी समाजात तेढ निर्माण होताना दिसत आहे. तर दुसरीकडे धनगर समाज देखील आरक्षणाच्या ( Dhangar Reservation )  मुद्द्यावरून आक्रमक झाला आहे.

या मुद्द्यावरून धनगर समाज राज्यात उपोषण, आंदोलन करताना दिसत आहे. अशाच राज्य सरकार या सर्व प्रकरणांवर काय निर्णय घेईल? याकडे आता संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलं आहे.

महत्वाच्या बातम्या