Immunity Booster | हिवाळ्यामध्ये सर्दी-खोकल्यापासून दूर राहायचे असेल तर नाष्ट्यामध्ये करा ‘या’ गोष्टींचा समावेश

Immunity Booster | टीम महाराष्ट्र देशा: हिवाळ्यामध्ये थंडीमुळे अनेकांना सर्दी, खोकला, व्हायरल इन्फेक्शन इत्यादी समस्यांना सामोरे जावे लागते.

या समस्या टाळण्यासाठी तुम्हाला तुमची रोगप्रतिकारशक्ती मजबूत ठेवणे अत्यंत आवश्यक आहे. रोगप्रतिकारशक्ती मजबूत करण्यासाठी तुम्ही तुमच्या आहारात काही बदल करू शकतात.

हिवाळ्यामध्ये तंदुरुस्त आणि निरोगी राहण्यासाठी तुम्ही काही पदार्थांचा तुमच्या नाष्ट्यामध्ये समावेश करू शकतात. हिवाळ्यामध्ये संसर्गजन्य रोगांपासून दूर राहण्यासाठी तुम्ही खालील पदार्थांचा नाष्ट्यात समावेश करू शकतात.

स्प्राऊट्स ( Sprouts-Immunity Booster )

स्प्राऊट्स आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर मानले जाते. कारण यामध्ये भरपूर प्रमाणात मॅग्नेशियम, फायबर, प्रोटीन, फॉस्फरस, पोटॅशियम, जस्त, आयरन, अँटिऑक्सिडंट, कॅलरीज, विटामिन ए, विटामिन बी, विटामिन सी, विटामिन ई आणि इतर अनेक पोषक घटक आढळून येतात.

त्यामुळे या थंडीच्या वातावरणात रोगप्रतिकारशक्ती मजबूत ठेवण्यासाठी तुम्ही दररोज सकाळी नाष्ट्यामध्ये याचे  सेवन करू शकतात.

पनीर  ( Paneer-Immunity Booster )

तुम्ही जर शाकाहारी असाल तर रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी पनीर तुमच्यासाठी एक चांगला पर्याय ठरू शकतो.

यामध्ये आढळणारे विटामिन डी, कॅल्शियम, प्रोटीन शरीराला पोषण प्रदान करण्यास मदत मिळतात. सकाळी नाष्ट्यामध्ये पनीरचे सेवन केल्याने शरीराला अतिरिक्त ऊर्जा मिळते, रोगप्रतिकारशक्ती वाढते, परिणामी तुम्ही मोसमी आजारांपासून दूर शकतात.

अंडी  ( Egg-Immunity Booster )

नाष्ट्याध्ये अंड्याचा समावेश करणे आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर ठरू शकते. अंड्यामध्ये विटामिन डी, कॅल्शियम इत्यादी पोषक घटक आढळून येतात.

त्याचबरोबर यामध्ये आढळणारे घटक हाडे मजबूत करतात, केसांची आणि त्वचेची काळजी घेतात. त्याचबरोबर नाष्ट्यामध्ये अंड्याचे सेवन केल्याने तुमची रोगप्रतिकारशक्ती वाढू शकते.

नियमित याचे सेवन केल्याने तुम्ही सर्दी, खोकला इत्यादी आजारांपासून दूर राहू शकतात.

पालक  ( Spinach -Immunity Booster )

हिवाळ्यामध्ये हिरव्या भाज्यांचे सेवन करणे आरोग्यासाठी उपयुक्त ठरू शकते. त्याचबरोबर हिवाळ्यामध्ये पालकाचे सेवन केल्याने रोगप्रतिकारशक्ती वाढते.

यामध्ये आढळणारे आयरन, विटामिन सी आणि अँटीऑक्सीडेंट गुणधर्म शरीराला निरोगी ठेवण्यास मदत करतात. त्यामुळे या हिवाळ्यात तुम्हाला निरोगी आणि तंदुरुस्त राहायचे असेल तर तुम्ही तुमच्या आहारात पालकाचा समावेश करू शकतात.

ओट्स  ( Oats-Immunity Booster )

ओट्समध्ये अनेक पोषक तत्व आढळून येतात, जे आरोग्यासाठी उपयुक्त ठरू शकतात. यामध्ये विरघळणारे फायबर, बीटा-ग्लुकन, जीवनसत्व आणि प्रथिने आढळून येतात, जे तुमची रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यास मदत करतात.

त्याचबरोबर याचे सेवन केल्याने पोट दीर्घकाळ भरते. परिणामी तुम्हाला कमी भूक लागते आणि वजन नियंत्रणात राहण्यास मदत होते.

टीप: वरील गोष्टी करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्या.

महत्त्वाच्या बातम्या

कृपया जाहिरातींना अनुमती द्या

तुम्ही जाहिरात ब्लॉकर वापरत आहात असे दिसते. आमच्या साइटला आर्थिक मदत मिळवण्यासाठी आम्ही जाहिरातींवर अवलंबून असतो. कृपया जाहिरातींना अनुमती द्या.