🕒 1 min read
Travel Tips | टीम महाराष्ट्र देशा: हिवाळ्यामध्ये सर्वांची पावले पर्यटक स्थळांकडे वळतात. कारण या ऋतूमध्ये फिरण्यासाठी उत्तम वातावरण असते.
या वातावरणात बहुतांश लोक शिमला, मनाली, मसुरी इत्यादी ठिकाणांना भेट देतात. त्यामुळे या ठिकाणी दिवसेंदिवस गर्दी वाढत चालली आहे.
अशात तुम्ही जर शांततेच्या ठिकाणांना ( Travel Tips ) भेट देण्याचा विचार करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकते.
कारण या बातमीच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला हिवाळ्यामध्ये शांत आणि सुंदर असलेल्या जागांबद्दल ( Travel Tips ) माहिती सांगणार आहोत.
वाराणसी, उत्तर प्रदेश ( Varanasi, Uttar Pradesh-Travel Tips )
वाराणसी हे अत्यंत सुंदर आणि पवित्र शहर आहे. वाराणसीमध्ये तुम्हाला सुंदर गंगा आरतीचा नजारा बघायला मिळेल.
त्याचबरोबर या ठिकाणी असलेले घाट अतिशय सुंदर आहे. या ठिकाणी तुम्हाला गंगा आरती, मंदिर, बोट राईड, घाट इत्यादी गोष्ट आकर्षित करतात.
वाराणसीला भेट देण्यासाठी डिसेंबर ते फेब्रुवारी सर्वोत्तम कालावधी असतो. वाराणसीला भेट देण्यासाठी तुम्ही रेल्वे किंवा विमानाद्वारे प्रवास करू शकतात.
कुर्ग, कर्नाटक ( Coorg, Karnataka-Travel Tips )
कर्नाटक राज्यामध्ये वसलेलं कुर्ग शहर भारतातच स्कॉटलंड म्हणून ओळखलं जातं. या ठिकाणी तुम्हाला निसर्गाचे सर्वोत्तम नजारे दिसतील.
त्याचबरोबर या ठिकाणी असलेले धुक्याच्या वातावरणात वाहणारे भव्य धबधबे आणि कॉफीचे मळे लोकांना आकर्षित करतात.
या ठिकाणाला भेट देण्यासाठी ऑक्टोबर ते मार्च सर्वोत्तम कालावधी असतो. या ठिकाणी तुम्ही बस, आणि रेल्वेने पोहोचू शकतात.
कच्छ, गुजरात ( Kutch, Gujarat-Travel Tips )
गुजरातमध्ये स्थित असलेलं कच्छ हे अतिशय सुंदर आहे. या ठिकाणी दोन महिन्यांचा सांस्कृतिक उत्सव रन ऑफ कच्छ आयोजित करण्यात येतो.
हिवाळ्यामध्ये या उत्सवाचे आयोजन केले जाते. या उत्सवामध्ये तुम्हाला पारंपारिक खाद्य, वाळवंट सफारी, हस्तकलेचे नमुने, कला, संस्कृती इत्यादींचे दर्शन होते. या उत्सवाला देशासह विदेशातील पर्यटक उपस्थित राहतात.
महत्वाच्या बातम्या
- IPL 2024 | IPL लिलावासाठी तब्बल 1166 खेळाडूंची नोंदणी; 830 भारतीय खेळाडूंचा समावेश
- Ajit Pawar | मराठा आंदोलनाचा अजित पवारांना पुन्हा एकदा फटका? केला छत्रपती संभाजीनगर दौरा रद्द
- Raj Thackeray | राज ठाकरे आणि एकनाथ शिंदेंची युती होणार? भेटीमुळे चर्चांना उधाण
- Manoj Jarange | आम्हाला ओबीसीतून आरक्षण पाहिजे आणि आम्ही ते मिळवणारच – मनोज जरांगे
- Sanjay Raut | अजित पवार आणि एकनाथ शिंदे जे बोलतात भाजपची स्क्रिप्ट – संजय राऊत
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now











