Sanjay Raut | अजित पवार आणि एकनाथ शिंदे जे बोलतात भाजपची स्क्रिप्ट – संजय राऊत

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Sanjay Raut | मुंबई: काल अजित पवार गटाचा कर्जत येथे मेळावा पार पडला. या मेळाव्यामध्ये बोलत असताना अजित पवार ( Ajit Pawar ) यांनी शरद पवार गटावर शाब्दिक हल्लाबोल चढवला आहे.

याच पार्श्वभूमीवर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत ( Sanjay Raut ) यांनी भारतीय जनता पक्षाला धारेवर धरलं आहे. अजित पवार आणि एकनाथ शिंदे ( Eknath Shinde ) जे बोलतात ती भाजपची स्क्रिप्ट असते, असं संजय राऊत ( Sanjay Raut ) यांनी म्हटलं आहे.

प्रसार माध्यमांशी बातचीत करत असताना संजय राऊत ( Sanjay Raut ) म्हणाले, “एकनाथ शिंदे, अजित पवार जे बोलतात ती भारतीय जनता पक्षाची स्क्रिप्ट असते.

भारतीय जनता पक्ष उद्धव ठाकरे ( Uddhav Thackeray ) आणि शरद पवार ( Sharad Pawar ) यांचा पराभव करू शकत नाही. तेव्हा ते पक्ष आणि घर फोडतात. त्यातून देखील काही साध्य झालं नाही तर ते चारित्र्यहनन करतात.”

पुढे बोलताना ते ( Sanjay Raut ) म्हणाले, “काही दहशतवादी संघटना या प्रकारची भूमिका मांडत होत्या. खोटे आरोप एखाद्या देशावर करायचे, असं या संघटना करत होत्या.

सध्या या पद्धतीने काही राजकीय पक्ष काम करत आहे. उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्या बाबतीत भाजपने हेच केलं आहे.

मात्र, घर आणि पक्ष फोडून शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांचे लोकं तुटत नसल्यामुळे ते चारित्र्यहनन करत आहे. परंतु आम्ही या सगळ्या गोष्टींना सामोरे जाऊन उभे राहणार आहोत.”

BJP wants to end the party of Uddhav Thackeray and Sharad Pawar – Sanjay Raut 

“उद्धव ठाकरे आणि शरद पवारांचा पक्ष भाजपला संपवायचा आहे. अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांच्या मदतीने त्यांना राष्ट्रवादी आणि शिवसेनेला नेस्तनाबूत करायचं आहे.

परंतु, ते शक्य नाही. 2024 ला महाराष्ट्रात आणि दिल्लीत आमचं सरकार येणार आहे”, असंही त्यांनी ( Sanjay Raut ) यावेळी म्हटल आहे.

महत्वाच्या बातम्या