Cyclone Michaung | 5 डिसेंबरला धडकणार ‘मिचॉन्ग’ चक्रीवादळ; महाराष्ट्रात मुसळधार पावसाची शक्यता

Cyclone Michaung | टीम महाराष्ट्र देशा: ऐन थंडीच्या दिवसात देशासह राज्यातील काही भागात पाऊस धुमाकूळ घालत आहे.  बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे वातावरणात बदल होत आहे.

या वातावरणामुळे शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. अशात शेतकऱ्यांसाठी चिंताजनक माहिती समोर आली आहे.

2 ते 4 डिसेंबर दरम्यान देशातील अनेक भागात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. त्याचबरोबर आज आणि उद्या राज्यात अवकाळी पाऊस कोसळणार असल्याचं हवामान खात्याने म्हटलं आहे.

A low pressure area has formed in the Bay of Bengal

बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे राज्यातील वातावरणात बदल होत आहे. या कमी दाबाच्या क्षेत्राचं येत्या काही तासात ‘मिचॉन्ग’ ( Cyclone Michaung ) नावाच्या चक्रीवादळात रूपांतर होण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.

या चक्रीवादळाचा ( Cyclone Michaung ) सर्वाधिक धोका दक्षिण आंध्र प्रदेश आणि उत्तर तमिळनाडूच्या किनारपट्टीला असल्याचं म्हटलं जात आहे.

3 डिसेंबर पासून राज्यासह देशात पावसाचा ( Cyclone Michaung ) जोर वाढणार आहे. तर 4 आणि 5 डिसेंबर रोजी देशासह राज्यात हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस ( Cyclone Michaung ) पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

दरम्यान, ‘मिचॉन्ग’ ( Cyclone Michaung ) चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर तमिळनाडू, पुद्दूचेरी आणि कराईकल किनारपट्टी भागामध्ये हवामान खात्याने ऑरेंज अलर्ट जारी केला आहे.

2 ते 4 डिसेंबर या कालावधीमध्ये या भागात मुसळधार पाऊस ( Cyclone Michaung ) पडण्याचा अंदाज आहे. त्याचबरोबर राज्यामध्ये देखील पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

या पावसाने आधीच शेतकऱ्यांच्या हाता-तोंडाशी आलेला घास हिरावून घेतला आहे. अशात पुन्हा एकदा अवकाळी पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना सतर्क राहण्याचे आवाहन हवामान खात्याकडून करण्यात आले आहे.

महत्वाच्या बातम्या

कृपया जाहिरातींना अनुमती द्या

तुम्ही जाहिरात ब्लॉकर वापरत आहात असे दिसते. आमच्या साइटला आर्थिक मदत मिळवण्यासाठी आम्ही जाहिरातींवर अवलंबून असतो. कृपया जाहिरातींना अनुमती द्या.