Weather Update | टीम महाराष्ट्र देशा: महाराष्ट्रामध्ये वातावरणात (Weather) सतत बदल होत चालला आहे. राज्यात थंडी (Cold) चा पारा चांगलाच घासरला आहे. थंडीचा जोर वाढल्यामुळे जागोजागी शेकोटा पेटलेल्या दिसत आहे. अनेक जिल्ह्यांमध्ये तापमानाचा पारा 10 अंश सेल्सिअसच्या खाली येऊन पोहोचला आहे. या वाढत्या थंडीचा परिणाम शेतकऱ्यांच्या पिकांवर मोठ्या प्रमाणावर होताना दिसत आहे. त्यामुळे राज्यातील शेतकरी पुन्हा एकदा संकटात सापडला आहे.
गेल्या चार दिवसांपासून परभणी जिल्ह्यामध्ये तापमानात मोठी घट झाल्याचे दिसून आले आहे. परभणीमध्ये 7 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. पहाटेपासूनच हवेमध्ये गारवा जाणवत असल्यामुळे मॉर्निंग वॉकला जाणाऱ्यांची संख्या देखील कमी झाली आहे. तर, या वाढत्या थंडीच्या परिणाम जनसामान्यांच्या आरोग्यावर होताना दिसत आहे.
पुणे जिल्ह्यामध्ये देखील तापमान घट झाल्याचे दिसून आले आहे. काल पुण्यात 8.1 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली होती. पुण्यामध्ये देखील दिवसभर हवेत गारवा जाणवत असल्यामुळे लोक स्वेटर आणि कान टोप्या घालून बाहेर पडताना दिसत आहे.
नंदुरबार जिल्ह्यामध्ये तापमानात चांगलीच घसरण झाल्याचे दिसून आले आहे. जिल्ह्यामध्ये या वर्षातील सर्वात कमी म्हणजेच 7 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. त्यामुळे मी शेतकऱ्यांच्या रब्बी पिकांना फटका बसण्याची शक्यता निर्माण झाली आहे. शेतीतील गहू, हरभरा, ज्वारी या पिकांवर धोका निर्माण होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
राज्यामध्ये उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रामध्ये तापमानात चांगलीच घट झाल्याचे दिसून आली आहे. येथील काही जिल्ह्यांमध्ये तापमान 10 अंश सेल्सिअसच्या खाली येऊन पोहोचलं आहे. त्यामुळे दिवसेंदिवस हुडहुडी वाढत चालली आहे. या वाढत्या थंडीमुळे राज्यातील शेतकरी पुन्हा एकदा चिंतेत सापडला आहे. अवकाळी पावसामुळे राज्यातील शेतकऱ्यांना नुकसानाला सामोरे जावे लागले होते. आता पुन्हा एकदा वाढत्या थंडीमुळे शेतकऱ्यांची पिकं धोक्यात सापडली आहे.
महत्वाच्या बातम्या
- Hasan Mushrif | “कुठलाही गुन्हा नाही, समंस नाही आणि…”; हसन मुश्रीफ नेमकं काय म्हणाले?
- Nitesh Rane | “आदित्यच्या बापाचेच पद…”; नितेश राणेंची उद्धव ठाकरेंवर सडकून टीका
- Navneet Rana | “आमच्या मनातील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसच” – नवनीत राणा
- Devendra Fadanvis | “मागील सरकार ‘वर्क फॉर्म जेल’ चालायचे”; देवेंद्र फडणवीसांची महाविकास आघाडीवर बोचरी टीका
- Dipali Sayyed | उर्फी- चित्रा वाघ यांच्या वादात दिपाली सय्यद यांची उडी; म्हणाल्या, “तिला रस्त्यावर…”