Nitesh Rane | “आदित्यच्या बापाचेच पद…”; नितेश राणेंची उद्धव ठाकरेंवर सडकून टीका 

Nitesh Rane | वर्धा : उद्धव ठाकरेंच्या पक्षप्रमुख पदाची मुदत आता संपत आली आहे. तर, उद्धव ठाकरे यांचे शिवसेना पक्षप्रमुख पदच अवैध असल्याचा युक्तिवाद काल शिंदे गटाने निवडणूक आयोगासमोर केला. यावरुन आता भाजप आमदार नितेश राणे यांनी आदित्य ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे. आदित्य ठाकरेंच्या वडिलांच पद हे घटनाबाह्य असल्याचे त्यांनी म्हंटले आहे. आर्वी येथे भाजपच्या मेळाव्यास आले असताना ते बोलत होते.

पहिल्या दिवसापासून शिंदे फडणवीस सरकार घटनाबाह्य म्हणणाऱ्या आदित्यच्या बापाचेच पद घटनाबाह्य ठरत आहे, असे टीकास्त्र आमदार नितेश राणे यांनी आज सोडले. तो पक्षप्रमुखच घटनाबाह्य असल्याने तेव्हापासून सुरू सगळं घटनाबाह्य ठरते. सर्व घटनाबाह्य करत असताना तुम्हाला सरकारवर बोलण्याचा अधिकारच राहिला नाही, असा घणाघात नितेश राणे (Nitesh Rane) यांनी केला आहे.

पुढे ते म्हणाले, “धनुष्यबाण हा मुळात बाळासाहेबांच्या शिवसेनेचा आहे. ‘ईडी’ कुणाच्या घरी उगीच चहा घ्यायला जात नाही. माहिती मिळाल्यावर ते चौकशी करतात. भ्रष्टाचार नसेल तर थयथयाट करण्याची गरज नाही.” महाविकास आघाडीचे सरकार असताना आमची घरे तोडली. चुकीच्या केसेस लावल्या, अटक केल, असे आरोप देखील राणेंनी यावेळी बोलताना केलेत.

“समाजमाध्यमांवरील पोस्टवरून नेत्यांना चुकीच्या पद्धतीने अटक केली. ते दोषी चालतात. आता ‘ईडी’ची चौकशी सुरू झाली तर थयथयाट करतात. सर्वोच्च न्यायालय व उच्च न्यायालयास जे योग्य वाटते ते होते. त्यानुसार तारखा पडतात. त्यावर बोलणे उचित नाही”, अशा शब्दात राणेंनी सुनावलं.

महत्वाच्या बातम्या :

कृपया जाहिरातींना अनुमती द्या

तुम्ही जाहिरात ब्लॉकर वापरत आहात असे दिसते. आमच्या साइटला आर्थिक मदत मिळवण्यासाठी आम्ही जाहिरातींवर अवलंबून असतो. कृपया जाहिरातींना अनुमती द्या.