MLA Accidents | १५ दिवसात चार आमदारांच्या गाड्यांचा अपघात; नेमकं प्रकरण काय?

MLA Accidents | मुंबई : गेल्या काही दिवसांपासून  वर्तुळात अनेक प्रकरणांमुळे खळबळ उडाली आहे. त्यातीलच एक महत्वाचा मुद्दा म्हणजे आमदारांच्या गाड्यांना होणाऱ्या अपघातांची मालिका. भाजप’चे आमदार जयकुमार गोरे यांचा १५ दिवसांपुर्वी अपघात झाला. चाळीस फुट खोल चारचाकी गडगडत गेली. या भयानक अपघातातून गोरे वाचले. विशेष बाब म्हणजे वैयक्तिक टीका केल्यानंतरही शरद पवार त्यांना दवाखान्यात भेटले.

यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार धनंजय मुंडे यांच्या चारचाकीला आठवड्यापुर्वी अपघात झाला. परळीतील आझाद चौकात त्यांचा अपघात झाला होता. छातीला मार लागल्याने परळीतून मुंबईत त्यांना शिफ्ट केले. त्यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे त्यांना भेटायला गेले.  यामध्ये धनंजय मुंडे यांनी मला किरकोळ दुखापत झाल्याचे म्हटले होते. परंतु, बुधवारी सकाळी धनंजय मुंडे मुंबईच्या दिशेने जाण्यासाठी निघाले तेव्हा त्यांची अवस्था पाहून या अपघातात त्यांचा चेहरा आणि डोक्यालाही दुखापत झाल्याचे समजले. धनंजय मुंडे हे घरातून निघत असताना त्यांचे जवळचे कार्यकर्ते त्यांच्या डोक्यावर चापूनचोपून पटका बांधताना दिसले.

धनंजय मुंडे यांच्याकडून अपघातानंतर सोशल मीडियावरील एक पोस्ट वगळता फारशी माहिती देण्यात आली नाही. धनंजय मुंडे यांनी फेसबुक पोस्टमध्ये केवळ आपल्या छातीला किरकोळ मार लागल्याचे म्हटले होते. मात्र, धनंजय मुंडे यांच्या गाडीची अवस्था पाहता हा अपघात अगदीच किरकोळ स्वरुपाचा नसल्याचे स्पष्ट झाले. सोशल मीडियावर धनंजय मुंडे यांच्या अपघातग्रस्त गाडीचे फोटो व्हायरल होत आहे. यामध्ये धनंजय मुंडे यांची गाडी कव्हरने झाकून ठेवल्याचे दिसत आहे.

शिवसेना शिंदे गटाचे आमदार योगेश कदम यांच्या वाहनालाही मागून धडक दिली. चार दिवसांपूर्वी अपघात झाला. ‘अपघाताचा पॅटर्न नॉर्मल दिसल्याने नक्कीच घातपात आहे की नाही याची खात्री करुन घेणं देखील तितकंच गरजेचं आहे. म्हणून मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री महोदयांकडे सखोल चौकशीची मी मागणी करणार असल्याचं योगेश कदम यांनी म्हंटल. “हा अपघात नसून घातपात आहे”, असे त्यांचे वडील रामदास कदम म्हणाले. घातपाताचा आरोप उद्धव ठाकरेंवर केला. हे आरोप केवळ राजकीय आहेत.

प्रहारचे नेते तथा शिंदे समर्थक आमदार बच्चू कडु यांचा काल रस्ता ओलांडताना अपघात झाला. पायाला मार लागला आहे. तेही सध्या दवाखान्यात उपचार घेत आहेत. राजकीय भूमिकेवर बोट ठेवत सोशल मीडियावर लोक आमदारांनाच नावे ठेवत आहेत.

आमदार विनायक मेटे यांचा पुणे मुंबई महामार्गावर काही दिवसांपुर्वी अपघाती निधन झाले.  मेटे बीड जिल्ह्यातून मुंबईत महत्त्वाच्या बैठकीसाठी येत होते. कोणत्याही परिस्थितीत सकाळी लवकर मुंबईत पोहोचावे या उद्देशाने मेटेंच्या कारच्या चालकाने वेग वाढवला. या वाढवलेल्या वेगाने प्रवास झटपट झाला. पण मुंबई पुणे एक्सप्रेस वे वर रसायनी पोलिसांच्या हद्दीत असताना चालकाचे नियंत्रण सुटले असावे अथवा डोळ्यांवर झोप आल्यामुळे चालकाचे गाडीवरचे नियंत्रण सुटले असावे असा संशय व्यक्त होत आहे.  त्यानंतर आमदारांचे रात्रीचे प्रवास, चालकाची मानसिकता यावर चर्चा सुरु होती. मात्र यानंतरही महाराष्ट्रातील चार आमदारांचे गंभीर अपघात होत असतील तर, ही बाब विचार करायला लावणारी आहे.

महत्वाच्या बातम्या :

कृपया जाहिरातींना अनुमती द्या

तुम्ही जाहिरात ब्लॉकर वापरत आहात असे दिसते. आमच्या साइटला आर्थिक मदत मिळवण्यासाठी आम्ही जाहिरातींवर अवलंबून असतो. कृपया जाहिरातींना अनुमती द्या.