Dipali Sayyed | उर्फी- चित्रा वाघ यांच्या वादात दिपाली सय्यद यांची उडी; म्हणाल्या, “तिला रस्त्यावर…”

Dipali Sayyed | मुंबई : गेल्या काही दिवसांपासून भाजप नेत्या चित्रा वाघ आणि फॅशन आयकॉन उर्फी जावेद (Urfi Javed) यांच्यामध्ये वाद-विवाद सुरू होता.  या वादावर सेलिब्रिटींपासून राजकीय नेत्यांपर्यंत अनेकांनी आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. चित्रा वाघ यांनी उर्फीच्या कपड्यांवर आक्षेप घेतला होता. उर्फीचा नंगा नाच चालू देणार नाही असा इशारा देखील चित्रा वाघ यांनी केला होता. त्यांनी उर्फी विरोधात पोलीस तक्रार देखील केली होती. मात्र, पोलीस उर्फीवर कारवाई करत नसल्याने आणि उर्फी त्यांना रोज डिवचत असल्याने चित्रा वाघ संतापल्या आहे. चित्रा वाघ आणि उर्फी यांच्यामध्ये ट्विटरवर युद्ध सुरूच आहे. आता या वादावर अभिनेत्री दिपाली सय्यद (Dipali Sayyed) यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.

त्या म्हणाल्या, “फॅशन करावी, फॅशनला मोठा वाव आहे. फॅशन कुठेही करू शकता, पण कुठेतरी एक मर्यादा असते. प्रोफेशनल आणि रिअॅलिटी यात फरत आहे. या गोष्टी समजणं गरजेचं आहे. उर्फीने हे समजून घेतलं पाहिजे. सगळेच जण या वादात उतरले आहेत, पण रबर ताणला की तुटतो. त्यामुळे तो तुटायच्या आता यावर निर्णय घेणं गरजेचं आहे. उर्फीला समजवायला हवं.” त्याचबरोबर उर्फीच्या या गोष्टीचं समर्थन करत नसल्याचंही दिपाली सय्यद यांनी स्पष्ट केलं.

उर्फी जावेद तिचा उदरनिर्वाह करण्यासाठी ज्या गोष्टी करत आहे, त्या प्रोफेशनली करत आहे का? तिला रस्त्यावर येऊन फोटो काढण्याची परवानगी आहे का? असा सवाल दिपाली सय्यद (Dipali Sayyed) यांनी केला आहे. जर तिला परवानगी मिळत असेल तर बोलण्यात काही अर्थ नाही, पण जर तिला परवानगी मिळत नसेल आणि अशा पद्धतीचे कपडे घालून ती रस्त्यावर शूट करत असेल तर ते चुकीचं असल्याची प्रतिक्रिया दीपाली सय्यद (Dipali Sayyed) यांनी दिली.

पुढे त्या म्हणाल्या, “सार्वजनिक ठिकाणी अशा प्रकराचे कपडे घालणं योग्य नाही. शॉर्ट्स घालणं, फ्रॉक घालणं आणि उर्फी जे कपडे घालते त्यात फरक आहे. उर्फीचे कपडे ट्रान्सपरंट असतात, ते न घातल्यासारखेच असतात.” असे कपडे घालायला हिम्मत लागते. तिच्यातल्या हिमतीला मी सॅल्यूट करते. पण याच हिमतीचा वापर तिने वेगळ्या गोष्टीसाठी केला तर ती खूप मोठी होईल, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.

महत्वाच्या बातम्या :

कृपया जाहिरातींना अनुमती द्या

तुम्ही जाहिरात ब्लॉकर वापरत आहात असे दिसते. आमच्या साइटला आर्थिक मदत मिळवण्यासाठी आम्ही जाहिरातींवर अवलंबून असतो. कृपया जाहिरातींना अनुमती द्या.