Navneet Rana | अमरावती : राज्यात विधान परिषदेच्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघांतील पाच जागांसाठी निवडणूक जाहीर झाली आहे. त्यासाठी सर्वच पक्षाकडून जोरदार तयारी सुरु झाली आहे. यासाठी अमरावती पदवीधर मतदार संघातून भाजपने डॉ. रणजीत पाटील यांना उमेदवारी दिली आहे. याच पार्श्वभूमीवर आज अमरावतीमध्ये प्रचारसभा ठेवण्यात आली होती. यावेळी बोलताना खासदार नवनीत राणा (Navneet Rana) यांनी देवेंद्र फडणवीस यांचे कौतुक करत मोठे विधान केले आहे.
त्या म्हणाल्या, “पंतप्रधान नरेंद्र मोदी दिल्लीत आणि आमचे देवेंद्र फडणवीस या राज्यामध्ये. राज्यातून गोवा, गोव्यातून गुजरात. जिथं जिथं देवेंद्र फडणवीस यांचं पाऊल पडलं, तिथ तिथं न्यायासाठी लढणारा व्यक्ती देवेंद्र फडणवीस आहेत. त्यांच्या पाठीशी आपण उभे राहिले पाहिजे. त्यांच्या कामाची स्टाईल धडाकेबाज आहे.”
पुढे त्या म्हणाल्या, “त्यांच्या कार्यकर्तृत्वाचा डंका महाराष्ट्रात तर वाजतोच आहे, पण इतर राज्यातही त्यांच्या कामाची चर्चा होते. सर्वांना आपण उपमुख्यमंत्री वाटता. पण, आमची सर्वांची इच्छा आहे की आमचे मुख्यमंत्री आपणच आहात. आमच्या मनात आपण मुख्यमंत्री आहात. यात काही शंका नाही.”
दरम्यान, शिंदे-फडणवीस सरकार स्थापन झाल्यानंतर तत्कालीन प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मनावर दगड ठेऊन मुख्यमंत्री पद शिंदे यांना दिल्याची खंत व्यक्त केली होती. तर येत्या काळात देवेंद्र फडणवीस हेच राज्याचे नेतृत्व करतील, तेच मुख्यमंत्री होतील, असा दावा भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रदेशाध्यक्ष झाल्यानंतर केला. त्यांच्या या वक्तव्याने राजकीय वर्तुळात पुन्हा चर्चांना उधाण आलंय.
महत्वाच्या बातम्या :
- Devendra Fadanvis | “मागील सरकार ‘वर्क फॉर्म जेल’ चालायचे”; देवेंद्र फडणवीसांची महाविकास आघाडीवर बोचरी टीका
- Dipali Sayyed | उर्फी- चित्रा वाघ यांच्या वादात दिपाली सय्यद यांची उडी; म्हणाल्या, “तिला रस्त्यावर…”
- MLA Accidents | १५ दिवसात चार आमदारांच्या गाड्यांचा अपघात; नेमकं प्रकरण काय?
- Ajit Pawar । मुश्रीफांच्या घरावरील छापेमारीनंतर अजित पवार संतापले; म्हणाले, “ठरवून काही पक्षांवर…”
- ICC Rankings | वनडे क्रमवारीत विराट कोहलीसह ‘या’ दोन खेळाडूंची झेप