भाजपचा एकनाथ शिंदेंना मोठा धक्का; प्रचारपत्रकावरून बाळासाहेब ठाकरे, आनंद दिघेंचे फोटो हटवले

Narayan Rane campaign leaflet poster Balasaheb Thackeray Anand Dighe missing. Eknath Shinde Shiv Sena stopped campaigning

Lok Sabha Election : भाजप सोबत शिंदे गट ( Shiv Sena ) गेल्याने अनेक प्रकारच्या अडचणींचा सामना त्यांना करावा लागत आहे. विद्यमान खासदारांना आपली खासदारकीचे तिकीट मिळवता आलेले नाही. मित्रपक्षाचे उमेदवार सांभाळण्याची जबाबदारी शिवसेनेवर आलेचे चित्र दिसत आहे.

शिंदे गटाचे नेते सुरेश नवले एका मुलाखतीत म्हणतात, “मुख्यमंत्र्यांना (एकनाथ शिंदे) चक्रव्युहात अडकले असून, त्यांचा अभिमन्यू झाला आहे. भाजपच्या भट्टीत शिवसैनिकांचे बळी जात आहेत”, असा संताप नवले यांनी व्यक्त केला.

पुढे बोलतांना नवले म्हणाले, ”राज्यामध्ये शिवसेनेचा बळी देणं आणि शिवसेना संपवण्याचे कारस्थान भारतीय जनता पार्टी करत आहे. भाजप शिवसेना पक्ष संपवत आहे. आयबीचा रिपोर्ट, सर्व्हे निगेटिव्ह आहे म्हणत उमेदवारी नाकारत आहेत. भाजपच्या दबावाला एकनाथ शिंदे बळी पडले आहेत. मुख्यमंत्री भाजपच्या दबावाला एकाकी तोंड देत आहेत. ते कमी पडत आहेत. भाजप सामूहिक दबाव टाकत आहेत” असे आरोप नवले यांनी भाजपवर केले आहेत.

दरम्यान, याचा प्रत्यय यायला सुरवात झाली आहे. नारायण राणेंचा प्रचारपत्रकावरून बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांचे फोटो गायब झाले आहेत. यामुळे शिवसैनिकांमध्ये नाराजी पसरली आहे. शिवसैनिकांनी नारायण राणेंचा प्रचार थांबवण्याचा निर्णय घेतला आहे.

राणेंना तिकीट दिले म्हणून आगोदरच शिवसैनिक नाराज होते. परंतु पक्षाचा आदेश मानून त्यांनी कामास सुरवात केली होती. शिवसैनिकांत असलेली नाराजी दूर करण्याचे काम उदय सामंत आणि किरण सामंत गेले काही दिवस करत होते. आता कुठे त्यांच्या प्रयत्नांना यश येत असतानाच उमेदवाराच्या प्रचार साहित्यावर चक्क बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघेंचा फोटो नसल्याने शिवसैनिक चिडले आहेत.

सिंधुदुर्गात भाजप आपल्याला विश्वासात घेऊन काम करत नसल्याचं शिंदे गटाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते सांगत आहेत. जो पर्यंत विश्वासात घेऊन काम करत नाही तोपर्यंत लोकसभेच काम करणार नसल्याचे शिंदे शिवसेनेने म्हटलं आहे.

७ मे २०२४ रोजी सिंधुदुर्ग रत्नागिरी मतदारसंघासाठी मतदान प्रक्रिया राबवली जाणार आहे. मतदानाला अवघे पंधरा दिवस बाकी असताना अजूनही शिंदे गट विरुद्ध भारतीय जनता पार्टी यांच्यात वाद सुरु आहे. समन्वय बैठका सुरू असल्याने कार्यकर्त्यांमध्ये अजूनही संभ्रमाचं वातावरण असल्याचं दिसतंय.

SHIV SENA Balasaheb Thackeray and Anand Dighe photo missing on BJP campaign leaflet poster

bjp poster narayan rane
bjp poster narayan rane

महत्वाच्या बातम्या

कृपया जाहिरातींना अनुमती द्या

तुम्ही जाहिरात ब्लॉकर वापरत आहात असे दिसते. आमच्या साइटला आर्थिक मदत मिळवण्यासाठी आम्ही जाहिरातींवर अवलंबून असतो. कृपया जाहिरातींना अनुमती द्या.