Vishwajit Barne | पिंपरी-चिंचवडः मावळ लोकसभा मतदारसंघातील घाटावरील भागात तसेच घाटाखालील भागातही पनवेल, उरण, कर्जतमध्ये श्रीरंग बारणे यांचे पुत्र विश्वजीत बारणे यांनी महायुतीच्या प्रचाराचा धडाका सुरु केला आहे. प्रचारफेरी, कोपरा सभा, बैठका घेऊन आख्खा मतदार संघ पिंजून काढत आहेत. विश्वजीत बारणे तरुण असल्याने तरुणांचा त्यांना मोठा प्रतिसाद मिळत आहे. तरुणांमध्ये त्यांची मोठी ‘क्रेझ’ दिसून येत आहे. घाटाखालील तसेच घाटावरील भागांत वडिलांच्या प्रचाराची धुरा विश्वजीत यांनी हाती घेतली आहे.
मावळ लोकसभा मतदारसंघातील शिवसेना-भाजप-रिपाइं-रासप-रयत क्रांती संघटना महायुतीचे उमेदवार, खासदार श्रीरंग बारणे यांचा प्रचाराचा धडाका सुरु आहे. पदयात्रा-गाठीभेटी, कॉर्नर सभा घेऊन महायुतीच्या उमेदवाराने प्रचारात आघाडी घेतली आहे. खासदार बारणे यांचे सुपुत्र विश्वजीत हे वडिलांच्या प्रचारात सक्रिय झाले आहेत.
पिंपरी-चिंचवड ते पनवेल, कर्जत, उरण परिसर पिंजून काढला. विश्वजीत बारणे हे तरुण असल्याने त्यांना तरुणांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या प्रचारफेरीत तरुण मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. तरुणांमध्ये त्यांच्याबद्दल ‘क्रेझ’ दिसून आली. त्यांच्यासोबत सेल्फी घेण्यासाठी तरुणाईने गर्दी केली होती. शिवसेना-भाजप महायुतीचा विजय असो”, कोण आला रे कोण आला”, ”शिवसेनेचा वाघ आला”, येऊन येऊन येणार कोण, आप्पाशिवाय आहेच दुसरा कोण” अशा घोषणा देऊन परिसर दणाणून सोडला.
मावळ लोकसभा मतदारसंघातील शिवसेना-भाजप-राष्ट्रवादी- मनसे- आरपीआय- रासप- मित्रपक्ष महायुतीचे उमेदवार खासदार श्रीरंग बारणे यांच्या प्रचाराच्या शेवटच्या टप्प्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अजितदादा पवार, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, नामवंत अभिनेता गोविंदा या मान्यवरांच्या सभा व रोड शो होणार आहेत, अशी माहिती शिवसेनेचे जिल्हाप्रमुख बाळासाहेब वाल्हेकर यांनी दिली. निवडणुकीच्या प्रचाराची सांगता शनिवारी (11 में) पिंपरी-चिंचवडमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या रोड शो ने होईल. त्यानिमित्त महायुतीच्यावतीने जोरदार शक्ती प्रदर्शन करण्यात येणार आहे.
रविवारी (5 मे) संध्याकाळी पाच वाजता लोकप्रिय अभिनेता गोविंदा यांच्या हस्ते महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे यांच्या मध्यवर्ती निवडणूक कार्यालयाचे उद्घाटन होणार आहे. पिंपरी येथे डॉ. आंबेडकर पुतळ्याच्या मागे हे निवडणूक कार्यालय सुरू करण्यात आले आहे. उद्घाटन समारंभानंतर पिंपरी कॅम्प, पिंपरीगाव भागात गोविंदा यांचा रोड शो होईल.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सोमवारी (6 मे) पिंपरी-चिंचवडमध्ये रहाटणी येथे तर पनवेल मध्ये खारघर येथे प्रचार सभा घेणार आहेत. रहाटणी येथील कापसे लॉन्स येथे दुपारी दोन वाजता तर खारघर येथील रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलच्या मैदानावर पाच वाजता त्यांची सभा होणार आहे.
केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी हे मंगळवारी (7 मे) संध्याकाळी सहा वाजता कर्जत तालुक्यातील चौक फाटा मैदानावर जाहीर सभा घेणार आहेत.
राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष व उपमुख्यमंत्री अजित पवार हे गुरुवारी (9 मे) पिंपरी-चिंचवडमध्ये एक सभा मावळ विधानसभा मतदारसंघात एक सभा घेणार आहेत.
महत्वाच्या बातम्या