Share

‘लाडकी बहीण’ योजनेला खुशाल अजितदादांचे नाव द्या, आम्हाला आनंदच- हर्षवर्धन सपकाळ

लाडकी बहीण योजनेला अजित पवारांचे नाव देण्यावर काँग्रेसने भूमिका स्पष्ट केली आहे. तसेच २१०० रुपयांच्या हप्त्याबाबत सरकारला जाब विचारला आहे.

Published On: 

Ladki Bahin Yojana: योजनेला अजितदादांचे नाव द्या; काँग्रेसची मोठी मागणी!

राजकारणात विरोधकही कधीकधी अशा मागण्या करतात की भुवया उंचावतात, याचा प्रत्यय पुन्हा एकदा सोलापुरात आलाय. अजित पवारांच्या दुर्दैवी निधनानंतर (Ajit Pawar Death) राजकारण तापलेलं असतानाच आता काँग्रेसने एक मोठं विधान केलंय. “लाडकी बहीण योजनेला (Ladki Bahin Yojana) अजितदादांचं नाव दिलं तर आम्हाला आनंदच होईल,” असं म्हणत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी राजकीय वर्तुळात खळबळ उडवून दिली आहे.

सध्या राज्यात जिल्हा परिषद निवडणुकीचा (ZP Election) धुराळा उडालाय. प्रचाराच्या शेवटच्या दिवशी पंढरपुरात विठ्ठल दर्शनासाठी आलेले हर्षवर्धन सपकाळ (Harshwardhan Sapkal) यांनी सरकारला थेट जाब विचारला. आमदार अमोल मिटकरींनी ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेचे नाव बदलून ‘अजितदादांची लाडकी बहीण’ करावं, अशी मागणी केली होती. यावर बोलताना सपकाळ म्हणाले, “सत्ता भाजपची आहे, त्यांनी खुशाल योजनेला अजितदादांचं नाव द्यावं, आम्हाला त्याचा आनंदच आहे. पण सरकारने आधी हे सांगावं की लाडक्या बहिणींच्या खात्यात १५०० ऐवजी २१०० रुपये कधी जमा होणार?”

Ladki Bahin Yojana

यावेळी सपकाळांनी अजित पवारांच्या विमान अपघातावरून (Plane Crash) गंभीर प्रश्नही उपस्थित केले. “मुंढवा जमीन घोटाळ्यात जशी पार्थ पवारांना ‘क्लीन चीट’ दिली, तशी घाई या तपासात करू नका,” असा इशाराच त्यांनी सरकारला दिलाय. अपघाताबाबत मनात संशय असून याची सखोल आणि पारदर्शक चौकशी झालीच पाहिजे, अशी आग्रही मागणी काँग्रेसने लावून धरली आहे.

दरम्यान, १९९९ पासून आघाडीत लढल्याने काँग्रेसची पीछेहाट झाली असून यापुढे स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ‘एकला चलो रे’चा नारा सपकाळांनी दिलाय. प्रचाराच्या तोफा थंडावणार असून ७ फेब्रुवारीला मतदान होणार आहे, त्यामुळे या विधानाचे पडसाद मतपेटीतून उमटतात का, हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.

📌 महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही