Share

राजपाल यादवचं तिहार जेलमध्ये सरेंडर; ९ कोटींच्या ‘त्या’ प्रकरणामुळे कोर्टाने चांगलेच फटकारले

चेक बाऊन्स प्रकरणात अभिनेता राजपाल यादवने अखेर तिहार तुरुंगात सरेंडर केले आहे. ९ कोटींच्या थकबाकीवरून कोर्टाने त्याला चांगलेच फटकारले आहे.

Published On: 

Rajpal Yadav Surrender: चेक बाऊन्स प्रकरणी राजपाल यादवची रवानगी तिहार जेलमध्ये!

पडद्यावर आपल्या विनोदी अभिनयाने प्रेक्षकांना खळखळून हसवणारा अभिनेता खऱ्या आयुष्यात मात्र रडकुंडीला आलाय, असं म्हणण्याची वेळ आलीये. बॉलिवूड अभिनेता राजपाल यादव (Rajpal Yadav) याने अखेर तिहार तुरुंगात आत्मसमर्पण (Surrender) केलं आहे. चेक बाऊन्स प्रकरणी दिल्ली उच्च न्यायालयाने दिलेल्या दणक्यानंतर राजपालने हे पाऊल उचललं असून, सध्या या प्रकरणाची जोरदार चर्चा सिनेवर्तुळात सुरू आहे.

राजपाल यादवने गुरुवारी आत्मसमर्पण केलं. तत्पूर्वी, तो पुन्हा एकदा दिल्ली उच्च न्यायालयात हजर झाला होता. “मी २५ लाख रुपये घेऊन आलोय आणि उरलेले पैसेही लवकरच भरेल,” अशी विनवणी त्याने कोर्टाला केली. मात्र, न्यायालयाने त्याला चांगलंच फटकारलं. “कोणताही दिलासा देण्याआधी आत्मसमर्पण करणं गरजेचं आहे,” अशा शब्दांत कोर्टाने त्याची कानउघाडणी केली. तक्रारदार कंपनीची थकबाकी भरू या आश्वासनावर त्याला वारंवार वेळ दिली होती, पण प्रकरण चिघळत गेलं आणि थकबाकीचा आकडा चक्क ९ कोटी रुपयांवर पोहोचला आहे.

Rajpal Yadav Cheque Bounce Case

वास्तविक, कोर्टाने त्याला बुधवारी दुपारी ४ वाजेपर्यंत सरेंडर करण्याचे आदेश दिले होते. मात्र, “मी मुंबईत आहे,” असं सांगत त्याने वेळ मारून नेण्याचा प्रयत्न केला. यासाठी दोन दिवसांची मुदतही मिळाली होती, पण तरीही वेळेत हजर न झाल्याने न्यायालयाने कडक भूमिका घेतली. “आता कोणतीही उदारता दाखवण्याचं कारण उरलेलं नाही,” असं न्यायमूर्ती स्वरण कांता शर्मा यांच्या खंडपीठाने स्पष्ट केलं आणि त्याची मुदतवाढीची याचिकाही फेटाळून लावली.

राजपालच्या वकिलांनी ५० लाखांची व्यवस्था झाल्याचा दावा केला असला, तरी आता कायद्याचा फास आवळला गेलाय. एकीकडे ही कायदेशीर लढाई सुरू असतानाच, दुसरीकडे राजपाल यादव ‘भूत बांगला’ आणि ‘वेलकम टू द जंगल’ या मोठ्या सिनेमांमध्ये दिसणार आहे. पण सध्या तरी ‘छोटा डॉन’ला जेलची हवा खावी लागणार, हे नक्की.

📌 महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही