Share

भारत-पाक सामन्यावर सूर्याचं रोखठोक उत्तर; ‘त्या’ विधानाने पाकिस्तानला आरसा दाखवला!

“आम्ही नाही, त्यांनी नकार दिलाय… आमची फ्लाईट बुक आहे,” सूर्यकुमार यादवने पाकिस्तानला सुनावले खडेबोल. १५ फेब्रुवारीच्या सामन्याबाबत मोठी अपडेट.

Published On: 

Suryakumar Yadav on IND vs PAK

“१५ तारखेचा सामना होणार की नाही?” सध्या क्रिकेटमध्ये हाच एक प्रश्न फिरतोय. पाकिस्तानच्या नखर्‍यांमुळे संभ्रम वाढला असला तरी, भारतीय कर्णधार सूर्यकुमार यादवने (Suryakumar Yadav) मात्र विषय एका वाक्यात संपवलाय. ७ फेब्रुवारीपासून सुरू होणाऱ्या टी-20 वर्ल्ड कपपूर्वी झालेल्या पत्रकार परिषदेत सूर्याने पाकिस्तानला सणसणीत चपराक लगावली आहे.

टी-२० वर्ल्ड कप २०२६ (T20 World Cup 2026) च्या पार्श्वभूमीवर ५ फेब्रुवारीला कर्णधारांची पत्रकार परिषद झाली. यावेळी पत्रकारांनी १५ फेब्रुवारीला कोलंबोमध्ये होणाऱ्या भारत-पाक सामन्याबद्दल छेडलं असता सूर्याने आपल्या स्टाईलमध्ये ‘सिमारेषेपार’ उत्तर दिलं. “आम्ही खेळायला नाही म्हणालो नाहीये, नकार त्यांनी दिलाय. आमची फ्लाईट तर आधीच बुक आहे आणि आम्ही कोलंबोला जाणारच!” असं सांगत सूर्याने चेंडू पाकिस्तानच्या कोर्टात टोलवला आहे.

Suryakumar Yadav on IND vs PAK

सूर्याने स्पष्ट केलं की टीम इंडियाचं वेळापत्रक फिक्स आहे. आधी USA, मग नेदरलँड्स आणि त्यानंतर १५ फेब्रुवारीला कोलंबो गाठायचं, हे ठरलंय. “त्यांच्या निर्णयावर आमचं नियंत्रण नाही, पण आम्हाला जिथे सांगाल तिथे खेळायला आम्ही तयार आहोत. याआधीही आशिया कपमध्ये आम्ही खेळलोय,” अशा शब्दांत त्याने भारतीय संघाचा (Team India) ॲटीट्युड दाखवून दिला.

ड्रेसिंग रूममधल्या वातावरणावरही सूर्याने भाष्य केलं. वैयक्तिक रेकॉर्डपेक्षा टीम महत्त्वाची, हे सांगताना त्याने ईशान किशनचं (Ishan Kishan) उदाहरण दिलं. नव्वदीत असतानाही षटकार ठोकून शतक पूर्ण करणं, हेच Fearless Cricket सध्याची टीम इंडिया खेळतेय, असं तो म्हणाला.

दुसरीकडे, बीसीसीआयचे उपाध्यक्ष राजीव शुक्ला यांनीही सावध पवित्रा घेतलाय. “निर्णय घेण्याचा अधिकार पूर्णपणे ICC कडे आहे, ते म्हणतील तसं आम्ही करू,” असं त्यांनी स्पष्ट केलंय. आता पाकिस्तान सरकार आणि पीसीबी (PCB) काय भूमिका घेतं, याकडे सर्वांचं लक्ष लागलंय.

📌 महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही