🕒 1 min read
‘बुद्धीचा दुष्काळ आणि अज्ञानाचा पूर’ म्हणतात ना, ते पाकिस्तानात नेमकं लागू पडतंय की काय? असा प्रश्न पडावा, अशी घटना समोर आली आहे. खेळाच्या मैदानात राजकारण नको असं आपण म्हणतो, पण टी-२० वर्ल्ड कप तोंडावर असताना एका पाकिस्तानी नटाने चक्क बॉम्बने उडवून देण्याची भाषा केली आहे. त्याच्या या विधानाने सोशल मीडियावर संतापाची लाट उसळली आहे.
अरसलान नदीर (Arslan Naseer) या पाकिस्तानी यूट्यूबर आणि अभिनेत्याचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर आगीसारखा पसरला आहे. यात त्याने अकलेचे तारे तोडत थेट ICC (International Cricket Council) ला लक्ष्य केलंय. व्हायरल व्हिडिओमध्ये तो म्हणतोय, “तुम्ही तुमच्या लायकीत राहा. हे तुमचं छोटं २५ लोकांचं ऑफिस आहे, तिथे मजा करत यूट्यूब आणि नेटफ्लिक्स पाहा. तुमचं ऑफिस दुबईत आहे म्हणून तुम्ही सुरक्षित आहात. जर ICC चं ऑफिस भारतात असतं, तर आमच्या लोकांनी त्याचं मुख्यालय आणि परिसर बॉम्बनं उडवून दिला असता.”
Pakistani YouTuber Threat
अरसलानची जीभ इथेच थांबली नाही, तर त्याने आयसीसीचे अध्यक्ष जय शाह (Jay Shah) यांच्यावरही खालच्या पातळीवर जाऊन टीका केली आहे.
येत्या ७ फेब्रुवारी २०२६ पासून भारत आणि श्रीलंकेत टी-२० वर्ल्ड कपचा थरार सुरू होतोय. मात्र, पाकिस्तानची नाटकं संपता संपत नाहीयेत. १ फेब्रुवारीलाच पाकिस्तान सरकारने “आम्ही वर्ल्ड कपमध्ये खेळू, पण भारताविरुद्ध मैदानात उतरणार नाही,” असा आडमुठा निर्णय जाहीर केला. पाकिस्तानच्या या हट्टामुळे स्पर्धेचं आर्थिक गणित कोलमडण्याची भीती आहे. भारत-पाक सामना न झाल्यास आयसीसीला हजारो कोटींचा फटका बसू शकतो.
दुसरीकडे, बांगलादेशने त्यांचे सामने श्रीलंकेत खेळवण्याची मागणी केली होती, जी आयसीसीने फेटाळली. त्यामुळे आता बांगलादेशच्या जागी स्कॉटलंडला (Scotland) संधी देण्यात आली आहे, अशी माहिती समोर येत आहे. एकीकडे पाकिस्तानची दादागिरी आणि दुसरीकडे यूट्यूबरच्या धमक्या, यामुळे वर्ल्ड कपपूर्वीच वातावरण चांगलंच तापलं आहे.
📌 महत्वाच्या बातम्या
- अजितदादांच्या आठवणीत गौतमी पाटील भावूक; दादांच्या ‘त्या’ दोन शब्दांनी जिंकलं होतं मन!
- अभिषेक शर्माचा जोडीदार कोण? ईशान किशन की संजू सॅमसन?; सूर्याच्या एका निर्णयानं पलटलं गणित!
- सोनम कपूरचा ‘तो’ लूक पाहून नेटकरी चक्रावले; भररस्त्यात फ्लाँट केला बेबी बंप
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now











