🕒 1 min read
मुंबई : बॉलीवूडमध्ये फॅशनचा विषय निघाला की पहिलं नाव डोळ्यासमोर येतं ते म्हणजे सोनम कपूर (Sonam Kapoor). पण कधीकधी स्टाईलच्या नादात असं काही घडतं की, पाहणारेही थोडा वेळ विचारच करत बसतात. सध्या सोनमच्या बाबतीत असंच काहीसं घडलंय. दुसऱ्यांदा आई होणाऱ्या सोनमने नुकताच आपला बेबी बंप ज्या पद्धतीने फ्लाँट केलाय, ते पाहून नेटकऱ्यांच्या भुवया उंचावल्या आहेत.
सोनमने काही दिवसांपूर्वीच गुड न्यूज दिली होती. नुकतीच ती मुंबईच्या रस्त्यांवर स्पॉट झाली, पण यावेळी तिचा अंदाज जरा हटके आणि बोल्ड होता. तिने प्रसिद्ध डिझायनर ध्रुव कपूरने डिझाइन केलेला पांढऱ्या रंगाचा शर्ट आणि स्कर्ट परिधान केला होता. मात्र, या शर्टची मधली बटणं उघडी ठेवून तिने आपला बेबी बंप स्पष्टपणे दाखवला. तिची बहीण रिया कपूर (Rhea Kapoor) आणि स्टायलिस्ट सान्या कपूर यांनी हा लूक स्टाईल केला असून, रियाने याला “Werking Mother” असं कॅप्शन दिलं आहे.
Sonam Kapoor Baby Bump
पण हा ‘फॅशन फंडा’ नेटकऱ्यांच्या पचनी पडलेला दिसत नाही. सोनमचे फोटो व्हायरल होताच सोशल मीडियावर मीम्सचा (Memes) पाऊस पडायला सुरुवात झाली. काहींनी तिच्या धाडसाचं कौतुक केलंय, तर अनेकांनी “हे जरा जास्तच झालं!” म्हणत तिला ट्रोल करण्याचा प्रयत्न केलाय. सध्या तिचे हे फोटो आणि त्यावर लोकांच्या उड्या पडणाऱ्या प्रतिक्रिया इंटरनेटवर चांगल्याच व्हायरल होत आहेत.
📌 महत्वाच्या बातम्या
- सोन्याच्या भावात वाढ; एका दिवसात चांदी १० हजारांनी महागली, सोन्यानेही ओलांडली सीमा!
- ‘लाडकी बहीण’ योजनेचं नाव बदलणार? अजितदादांच्या नावाची मागणी होताच फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं!
- संसदेच्या पायऱ्यांवर पुन्हा जुळली ‘केमिस्ट्री’; संसदेत एकत्र दिसले कंगना रनौत-चिराग पासवान
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now








