Share

‘लाडकी बहीण’ योजनेचं नाव बदलणार? अजितदादांच्या नावाची मागणी होताच फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं!

लाडकी बहीण योजनेला दिवंगत अजित पवार यांचे नाव देण्याची मागणी अमोल मिटकरी यांनी केली असून, यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी “आम्ही बसून निर्णय घेऊ” अशी प्रतिक्रिया दिली आहे.

Published On: 

Ladki Bahin Yojana Name Change: योजनेला अजित पवारांचं नाव? फडणवीसांचे मोठे विधान

राजकारणात योजनांची नावं बदलणं आणि त्यावरून वाद होणं हे काही नवीन नाही, पण आता राज्याच्या सर्वात लोकप्रिय ठरलेल्या योजनेचं नाव बदलण्याची मागणी जोर धरू लागली आहे. ‘मुख्यमंत्री लाडकी बहीण योजने’ला (Ladki Bahin Yojana) दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांचं नाव देण्यात यावं, अशी मागणी समोर आली आहे. या मागणीनंतर राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा चर्चांना उधाण आलं असून, खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावर महत्त्वाची प्रतिक्रिया दिली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार गट) आमदार अमोल मिटकरी (Amol Mitkari) यांनी ही मागणी लावून धरली आहे. ते म्हणाले की, “ही योजना अजितदादांच्या दूरदृष्टीतून साकार झाली होती. त्यामुळे त्यांच्या आठवणी जपण्यासाठी या योजनेचे नामकरण ‘अजितदादांची लाडकी बहीण योजना’ असं करण्यात यावं.”

Ladki Bahin Yojana Name Change

मिटकरींच्या या मागणीवर प्रसारमाध्यमांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांना प्रश्न विचारला असता त्यांनी सूचक विधान केलं. फडणवीस म्हणाले, “लाडकी बहीण योजनेबाबत अनेक मागण्या समोर येत आहेत. याबाबत आम्ही सर्वजण एकत्र बसून योग्य तो निर्णय घेऊ.” फडणवीसांनी ही मागणी फेटाळली नाही, पण थेट होकारही दिला नाही, त्यामुळे सस्पेन्स कायम आहे.

दुसरीकडे, आर्थिक पाहणी अहवालानुसार राज्याची महसुली तूट वाढत असल्याचं समोर आलं आहे. मात्र, तिजोरीवर भार पडत असला तरीही ही योजना कोणत्याही परिस्थितीत बंद होणार नाही, असं महायुती सरकारने यापूर्वीच स्पष्ट केलं आहे. जून २०२४ पासून सुरू झालेली ही योजना कधी निधीमुळे तर कधी केवायसीमुळे चर्चेत राहिली. आता ‘नामांतराच्या’ विषयामुळे ही योजना पुन्हा एकदा राजकीय आखाड्यात केंद्रस्थानी आली आहे. सरकार आता यावर काय निर्णय घेणार, हे पाहणं औत्सुक्याचं ठरेल.

📌 महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही