Share

वर्ल्डकपमध्ये भारताला ‘या’ गोष्टीपासून मोठा धोका; धोनीने स्पष्टच सांगितलं, म्हणाला “मी सुद्धा…”

टी२० वर्ल्डकपसाठी टीम इंडिया सज्ज असली तरी ‘दव’ फॅक्टरमुळे मोठा फटका बसू शकतो, अशी भीती महेंद्रसिंह धोनीने व्यक्त केली आहे.

Published On: 

MS Dhoni Warning: वर्ल्डकपमध्ये भारताला 'या' गोष्टीचा धोका!

भारताची विजयी घोडदौड सुरू आहे, पण वर्ल्डकपच्या मैदानात कधी काय घडेल याचा नेम नाही. टीम इंडिया सध्या सुसाट असली तरी एक ‘शत्रू’ असा आहे जो क्षणात होत्याचं नव्हतं करू शकतो. खुद्द ‘कॅप्टन कूल’ महेंद्रसिंह धोनीने (MS Dhoni) आता ही धोक्याची घंटा वाजवली आहे. टी२० वर्ल्डकप २०२६ च्या तोंडावर धोनीने संघाला सावध राहायला सांगितलंय.

एका कार्यक्रमात बोलताना धोनीने टीम इंडियाच्या तयारीवर मोकळेपणाने भाष्य केलं. तो म्हणाला, “सध्याचा भारतीय संघ प्रचंड घातक आहे. खेळाडूंकडे अनुभव आहे आणि त्यांना दबावात कसं खेळायचं हे पक्कं ठाऊक आहे.” पण, याचवेळी धोनीने एका अशा गोष्टीकडे लक्ष वेधलं, ज्यामुळे चाहत्यांच्या पोटात गोळा येऊ शकतो. धोनीला प्रतिस्पर्धी संघांची नाही, तर मैदानावर पडणाऱ्या ‘दव’ (Dew Factor) ची जास्त भीती वाटते.

MS Dhoni Warning

आपल्या जुन्या आठवणींना उजाळा देत धोनी म्हणाला, “जेव्हा मी खेळायचो, तेव्हा मी सुद्धा दवाला खूप घाबरायचो.” क्रिकेटमध्ये दव पडलं की सगळंच गणित बिघडतं. अशावेळी नाणेफेक (Toss) जिंकणं हे सामन्याच्या निकालावर मोठा परिणाम करतं. “जर परिस्थिती चांगली असेल आणि दव नसेल, तर हा भारतीय संघ १० पैकी बहुतांश सामने सहज खिशात टाकू शकतो,” असा विश्वासही त्याने व्यक्त केला.

टी-२० फॉरमॅटमध्ये एका खेळाडूचा खराब दिवस किंवा प्रतिस्पर्ध्याचा नशीबवान दिवस सारं चित्र पालटू शकतो. त्यामुळे “कोणताही खेळाडू जखमी होऊ नये आणि प्रार्थना कामी यावी,” अशी अपेक्षाही धोनीने व्यक्त केली आहे.

📌 महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही