Share

अदानी हेलिकॉप्टरचीही निर्मिती करणार! आता भारतातच बनवणार हेलिकॉप्टर्स; ‘या’ दिग्गज कंपनीशी हातमिळवणी

अदानी समूहाने हेलिकॉप्टर निर्मितीसाठी इटालियन कंपनी लिओनार्डोसोबत करार केला असून, यामुळे भारतीय संरक्षण क्षेत्राला मोठी बळकटी मिळणार आहे.

Published On: 

Adani Leonardo Deal: अदानी आता हेलिकॉप्टर बनवणार! संरक्षण क्षेत्रात मोठी उडी

जमिनीवरचं साम्राज्य तर उभं केलंच, पण आता आकाशातही आपली ताकद दाखवण्यासाठी अदानी (Adani Group) सज्ज झालेत. उद्योगपती गौतम अदानी यांनी एक असा निर्णय घेतलाय, ज्यामुळे संरक्षण क्षेत्रात मोठी खळबळ उडाली आहे. आतापर्यंत आपण अदानींना पोर्ट्स आणि एअरपोर्ट्स सांभाळताना पाहिलंय, पण आता त्यांची कंपनी चक्क हेलिकॉप्टर निर्मितीच्या मैदानात उतरली आहे.

गौतम अदानींच्या (Gautam Adani) ‘अदानी डिफेन्स अँड एरोस्पेस’ने इटलीतील संरक्षण क्षेत्रातील दिग्गज कंपनी ‘लिओनार्डो’ (Leonardo) सोबत एक ऐतिहासिक करार केला आहे. मंगळवारी दिल्लीत पार पडलेल्या एका कार्यक्रमात या MoU वर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या. या भागीदारीमुळे आता परदेशावर अवलंबून न राहता, भारतातच हेलिकॉप्टर्सचं डिझाइन, उत्पादन आणि देखभाल (MRO) केली जाणार आहे.

Adani Group Leonardo Deal

भारतीय सैन्याला आधुनिक हेलिकॉप्टर्सची नितांत गरज आहे. या करारांतर्गत प्रामुख्याने AW169M आणि AW109 TrekkerM या जागतिक दर्जाच्या हेलिकॉप्टर्सची निर्मिती केली जाईल.

सध्याची परिस्थिती पाहिली तर एक धक्कादायक वास्तव समोर येतं. भारताची लोकसंख्या अफाट असूनही देशात सध्या २५० पेक्षाही कमी नागरी हेलिकॉप्टर्स उपलब्ध आहेत. मात्र, येत्या १० वर्षांत देशाला तब्बल “१००० हून अधिक हेलिकॉप्टर्सची गरज” भासणार आहे. ही प्रचंड तफावत भरून काढण्यासाठी आणि तरुणांना रोजगाराच्या संधी देण्यासाठी हा प्रकल्प ‘गेमचेंजर’ ठरू शकतो. केवळ लष्करीच नाही, तर भविष्यात नागरी वाहतुकीसाठीही या हेलिकॉप्टर्सचा वापर केला जाईल, असं कंपनीने स्पष्ट केलं आहे.

📌 महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही