Share

पवारांनी धोक्याची घंटा वाजवली; भारताच्या ‘त्या’ निर्णयामुळे शेतकऱ्यांवर मोठं संकट?

भारत-अमेरिका व्यापार करारामुळे अमेरिकन शेतमाल भारतात येण्याची शक्यता असून, यामुळे भारतीय शेतकऱ्यांचे नुकसान होऊ शकते, अशी भीती शरद पवारांनी व्यक्त केली आहे.

Published On: 

India-US Trade Deal: शरद पवारांनी व्यक्त केली मोठी भीती!

अमेरिकेसारख्या बलाढ्य देशाशी हात मिळवणी करताना आपल्या हक्काच्या माणसाचं म्हणजेच शेतकऱ्याचं हित जोपासलं जाईल का? हा प्रश्न सध्या अनेकांना पडलाय आणि याचीच धास्ती आता खुद्द राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांनी बोलून दाखवली आहे. बारामतीत पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी भारत आणि अमेरिका यांच्यातील नव्या करारावर बोट ठेवत सरकारला सावध केलं आहे.

शरद पवार म्हणाले की, “भारत आणि अमेरिका यांच्यातील नव्या India Us trade deal चा सविस्तर मसुदा अजून समोर यायचा आहे. पण प्राथमिक माहितीनुसार, या करारामुळे अमेरिकेला आता कृषी क्षेत्रात भारतात निर्यात करता येणार आहे.” नेमकं हेच कारण भारतीय शेतकऱ्यांच्या काळजात धडकी भरवणारं ठरू शकतं. कारण अमेरिका आर्थिकदृष्ट्या तगडा देश आहे. जर त्यांनी आपल्याकडील शेतमाल इथे पाठवायला सुरुवात केली, तर आपल्या स्थानिक बाजाराचं गणित बिघडू शकतं. “याचा थेट विपरीत परिणाम आपल्या शेतकऱ्यांवर होऊ शकतो,” अशी स्पष्ट भीती पवारांनी व्यक्त केली आहे.

Sharad Pawar Warns On India-US Trade Deal

दरम्यान, यावेळी पवारांनी अर्थसंकल्पावरही भाष्य केलं. अजित पवारांच्या अपघातामुळे मला दिल्लीला जाता आलं नाही, असं सांगत त्यांनी अर्थसंकल्पात सामान्य माणसावर कोणताही नवीन कर लादला नाही, ही ‘समाधानाची गोष्ट’ असल्याचं म्हटलं. मात्र, विकासाच्या गाडीला वेग देण्यासाठी अजून ठोस पावलं उचलली असती तर बरं झालं असतं, असं मतही त्यांनी मांडलं. एकंदरच, ‘व्यापार करार’ आणि ‘शेतकरी हित’ या मुद्द्यावर आता दिल्लीत काय हालचाली होतात, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

📌 महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही