🕒 1 min read
नियतीचा खेळ पाहा कसा असतो… ज्यांच्या अचानक एक्झिटने अवघा महाराष्ट्र अजूनही सुन्न आहे, ज्यांच्यावर अंत्यसंस्कार होऊन आठवडाही उलटला नाही, त्या अजित पवारांचा (Ajit Pawar) एक जुना व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. २५ जानेवारीला झालेल्या त्या दुर्दैवी विमान अपघाताची जखम अजूनही ओली असताना, दादांचा हा व्हिडिओ पाहून कार्यकर्त्यांच्या आणि चाहत्यांच्या डोळ्यांत पाणी तरळल्याशिवाय राहत नाही. दादांचा तोच जुना मिश्कील स्वभाव या व्हिडिओतून पुन्हा एकदा समोर आलाय.
हा व्हिडिओ ‘झी चित्र गौरव’ पुरस्कार सोहळ्यातील आहे. कार्यक्रमाचा होस्ट अवधूत गुप्तेने दादांना एक भन्नाट प्रश्न विचारला होता- “जर भविष्यात ‘द अजित पवार’ नावाचा बायोपिक आला, तर त्यात तुमची भूमिका कोणत्या अभिनेत्याने साकारावी?” यावर अजितदादांनी जराही विचार न करता क्षणाचाही विलंब न लावता बाजूला उभ्या असलेल्या निलेश साबळेकडे बोट दाखवत “डॉक्टरने करावं असं वाटतं”, असं उत्तर दिलं. हे ऐकून खुद्द निलेश साबळेही अवाक झाला होता.
Ajit Pawar Viral Video
यावेळी दादांनी निलेश साबळेच्या नकलांवरही मिश्कील भाष्य केलं. ते म्हणाले, “मी आरशासमोर प्रॅक्टिस करून भाषण करत नाही. पण डॉक्टरांनी जेव्हा माझ्या ‘या ठिकाणी… या ठिकाणी’ या सवयीची नक्कल केली, तेव्हा मला माझी चूक उमजली. त्यानंतर मी हा शब्द वापरणं कमी केलं.” एवढंच नाही तर, “डॉक्टर तुम्ही अधून मधून माझी अशी नक्कल करत चला, म्हणजे मलाही कळेल की माझं काय चुकतंय आणि काय दुरुस्त करायचं,” असं सांगत दादांनी आपल्या खिलाडूवृत्तीचं दर्शन घडवलं होतं. आज दादा आपल्यात नसले तरी त्यांच्या या आठवणी मात्र कायम जिवंत राहतील.
📌 महत्वाच्या बातम्या
- राधा पाटीलच्या आरोपांवर गौतमी पाटील पहिल्यांदाच बोलली; हसत-हसत दिलं ‘असं’ उत्तर की चर्चा तर होणारच!
- रोहित पवारांना सुप्रीम कोर्टाचा ‘धक्का’; भर कोर्टात न्यायाधीशांनी झापलं, विचारला ‘हा’ जाब!
- ट्रम्प यांच्या एका निर्णयाने भारतात खळबळ; सोने-चांदीच्या भावात मोठी उसळी, चांदी थेट अडीच लाखांवर!
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now










