मुंबई, 8 ऑक्टोबर: ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे आज पहाटे गोवा येथे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. मृत्यूसमयी ते ७५ वर्षांचे होते. अभिनयासोबतच सामाजिक कार्यातही ते नेहमी सक्रिय असायचे. ‘नाम फाउंडेशन’च्या माध्यमातून त्यांनी आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना मोठी मदत केली होती.
नाना पाटेकर यांचे राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी विशेष सख्य होते. हे दोघेही त्यांच्या बेधडक वक्तव्यांसाठी परिचित होते. २०१३ मधील एका घटनेवरून त्यांच्यातील या अनोख्या नात्याची आठवण ताजी होते. त्यावेळी अजित पवार राज्याचे उपमुख्यमंत्री होते.
राज्यात २०१३ मध्ये दुष्काळसदृश परिस्थिती होती आणि पाण्याच्या मागणीसाठी एका सामाजिक कार्यकर्त्याचे उपोषण सुरू होते. या पाणीटंचाईच्या काळात ग्रामीण भागातील एका सभेत अजित पवार यांनी धरण आणि पाण्याबाबत एक वादग्रस्त विधान केले होते. ते म्हणाले होते, ”पाणी सोडण्याची मागणी होतेय, पण ” धरणात पाणी नाही, मग काय त्यात लघवी करू का?”” या वक्तव्याचे तीव्र पडसाद उमटले होते आणि विरोधकही आक्रमक झाले होते.
त्याच वर्षी महाराष्ट्र सरकारने नाना पाटेकर यांना चित्रपटातील योगदानासाठी ‘राज कपूर विशेष योगदान पुरस्कार’ देऊन सन्मानित केले. राज्य चित्रपट पुरस्कार सोहळ्यात हा पुरस्कार स्वीकारताना नाना पाटेकर यांनी अजित पवार यांना त्यांच्या वादग्रस्त वक्तव्यावरून चिमटा काढला. पुरस्कारामुळे जबाबदारी वाढते, त्यामुळे बोलताना शब्द जपून वापरले पाहिजेत, असा टोला पाटेकरांनी पवारांकडे कटाक्ष टाकत लगावला होता.
नाना पाटेकर यांच्या भाषणानंतर अजित पवार यांनीही आपल्या भाषणात, यापुढे आपण शब्द जपून वापरू, असा शब्द त्यांना दिला होता. या प्रसंगानंतर अजित पवार यांनी धरणाच्या वक्तव्यासारखी चूक पुन्हा केली नसल्याचे सांगितले जाते.
📌 महत्वाच्या बातम्या
- नाना पाटेकरांच्या निधनानंतर तनुश्री दत्ताची प्रतिक्रिया; व्हिडीओमध्ये थेट नाव न घेता म्हटलं ‘इव्हिल डेड’
- पुण्यात पीएमपी बसमध्ये चोरी; गर्दीचा फायदा घेत ज्येष्ठ नागरिकाची २ लाखांची सोनसाखळी लांबवली
- आठ दिवसांपूर्वी बोलणं झालं, ‘लव्ह यू बाळा…’ नानांच्या शेवटच्या शब्दांनी तुकाराम मुंढे भावूक!
Quick Answers
नाना पाटेकर यांचे आज पहाटे गोवा येथे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. मृत्यूसमयी त्यांचे वय ७५ वर्षे होते.
नाना पाटेकर यांनी ‘नाम फाउंडेशन’च्या माध्यमातून आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना मोठी मदत केली होती.
महाराष्ट्र सरकारने नाना पाटेकर यांना चित्रपटातील योगदानासाठी ‘राज कपूर विशेष योगदान पुरस्कार’ देऊन सन्मानित केले होते.
पुरस्कारामुळे जबाबदारी वाढते, त्यामुळे बोलताना शब्द जपून वापरले पाहिजेत, असा टोला नाना पाटेकर यांनी अजित पवार यांच्याकडे कटाक्ष टाकत लगावला होता.
टीप: खालील झटपट उत्तरे AI च्या सहाय्याने तयार करण्यात आली असून ती वरील मूळ बातमीतील माहितीनुसार आहेत. अधिक संदर्भासाठी संपूर्ण बातमी वाचा.
Ask Maharashtra Desha
आधी महाराष्ट्र देशाच्या उपलब्ध बातम्यांमधून उत्तर शोधले जाईल. माहिती अपुरी असल्यास वेबवरील अतिरिक्त स्रोत तपासले जातील.









