Share

पुण्यात पीएमपी बसमध्ये चोरी; गर्दीचा फायदा घेत ज्येष्ठ नागरिकाची २ लाखांची सोनसाखळी लांबवली

पुण्यात विमाननगर ते वाघोली मार्गावर पीएमपी बसमध्ये प्रवास करणाऱ्या एका ज्येष्ठ नागरिकाची दोन लाखांची सोनसाखळी चोरीला गेली असून पोलीस तपास करत आहेत.

Published On: 

Pune PMPML bus passenger gold chain theft police investigation

पुणे, 8 ऑक्टोबर: पुण्यात पीएमपी बसमधून प्रवास करणाऱ्या एका ६० वर्षीय ज्येष्ठ नागरिकाच्या गळ्यातील दोन लाख रुपये किमतीची सोन्याची साखळी चोरीला गेल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी तक्रार प्राप्त झाल्यानंतर विमानतळ पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मंगळवारी (६ ऑक्टोबर) सायंकाळी पाचच्या सुमारास ही घटना घडली. वाघोलीतील उबाळेनगर परिसरात राहणारे हे ज्येष्ठ नागरिक विमाननगर ते वाघोली दरम्यान पीएमपी बसने प्रवास करत होते. बसमध्ये प्रचंड गर्दी आणि धक्काबुक्की होती. याच गर्दीचा फायदा घेऊन अज्ञात चोरट्याने अतिशय चलाखीने त्यांच्या गळ्यातील सोनसाखळी काढून घेतली.

प्रवास सुरू असताना काही वेळाने गळ्याला हात लागल्यानंतर साखळी चोरीला गेल्याची बाब या ज्येष्ठ नागरिकाच्या लक्षात आली. त्यांनी तातडीने बसमध्ये आणि आजूबाजूला शोध घेतला, परंतु तोपर्यंत चोरटा पसार झाला होता. यानंतर त्यांनी पोलिसांत धाव घेतली असून, पोलीस सध्या परिसरातील सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे चोरट्याचा शोध घेत आहेत.

पुण्यात सध्या पीएमपी बसमधील गर्दीचा फायदा घेऊन पाकीटमारी आणि सोनसाखळी लांबवण्याचे प्रकार वाढले असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. त्यामुळे प्रवाशांनी गर्दीच्या वेळी प्रवास करताना आपले दागिने, पाकीट आणि इतर किमती वस्तूंची काळजी घ्यावी, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.

📌 महत्वाच्या बातम्या

Quick Answers

पीएमपी बसमधून प्रवास करणाऱ्या एका ६० वर्षीय ज्येष्ठ नागरिकाच्या गळ्यातील दोन लाख रुपये किमतीची सोन्याची साखळी चोरीला गेली.

टीप: खालील झटपट उत्तरे AI च्या सहाय्याने तयार करण्यात आली असून ती वरील मूळ बातमीतील माहितीनुसार आहेत. अधिक संदर्भासाठी संपूर्ण बातमी वाचा.

AI-assisted · Powered by Gemini
AI ASSISTANT

Ask Maharashtra Desha

आधी महाराष्ट्र देशाच्या उपलब्ध बातम्यांमधून उत्तर शोधले जाईल. माहिती अपुरी असल्यास वेबवरील अतिरिक्त स्रोत तपासले जातील.

500 अक्षरांपर्यंत
हेही विचारू शकता
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही