स्वारगेट शिवशाही बस अत्याचार प्रकरण: न्यायालयात साक्ष देताना पीडितेला अश्रू अनावर, कामकाज तहकूब

स्वारगेटमध्ये शिवशाही बसमध्ये तरुणीवर झालेल्या अत्याचार प्रकरणाच्या सुनावणीवेळी न्यायालयात घटनाक्रम सांगताना पीडिता ढसाढसा रडली. तिची मानसिक स्थिती पाहून कामकाज तहकूब करण्यात आले.

Published On: 

Pune Swargate Shivshahi bus assault case court hearing

पुणे, 22 नोव्हेंबर: पुण्याच्या स्वारगेट बसस्थानकात उभ्या असलेल्या बंद शिवशाही बसमध्ये तरुणीवर झालेल्या अत्याचार प्रकरणाच्या खटल्याची सुनावणी आता सुरू झाली आहे. जिल्हा व सत्र न्यायाधीश डी. एस. देशमुख यांच्या न्यायालयात पहिल्याच दिवशी साक्ष नोंदवताना पीडितेला अश्रू अनावर झाले. न्यायालयासमोर घटनाक्रम सांगताना ती ढसाढसा रडल्याने तिची अस्वस्थ मानसिक स्थिती पाहून न्यायालयाने कामकाज तहकूब करण्याचा निर्णय घेतला.

ही धक्कादायक घटना २५ फेब्रुवारी २०२५ रोजी पहाटेच्या सुमारास स्वारगेट स्थानकात घडली होती. साताऱ्याला जाणारी बस तिथे लागते असे सांगून आरोपीने २६ वर्षीय तरुणीची दिशाभूल केली आणि तिला बंद पडलेल्या शिवशाही बसमध्ये नेऊन तिच्यावर अत्याचार केला. या प्रकरणी पोलिसांनी दत्तात्रेय गाडे याला अटक केली आहे. तो रेकॉर्डवरील गुन्हेगार असून त्याच्यावर याआधीही काही गुन्हे दाखल आहेत.

या प्रकरणासाठी जून २०२६ मध्ये विशेष न्यायालयात आरोपीवर आरोप निश्चित करण्यात आले होते. विशेष सरकारी वकील अजय मिसर यांनी आरोपीविरोधातील पुरावे आणि तब्बल ८७ साक्षीदारांची यादी न्यायालयात सादर केली आहे. या खटल्यात ॲड. मिसर यांना ॲड. प्रथमेश शिंगणे, ॲड. राकेश सोनार आणि ॲड. राधिका नावंदर-जोशी हे न्यायालयीन कामकाजात सहकार्य करत आहेत. आता या खटल्याची पुढील सुनावणी ५ डिसेंबर रोजी होणार आहे.

📌 महत्वाच्या बातम्या

MHD News

सत्य, निष्पक्षता आणि नव्या दृष्टिकोनाची कास धरत, 'महाराष्ट्र देशा' प्रत्येक घटनेचं प्रामाणिक रिपोर्टिंग करत आले आहे. अचूक आणि वेगवान बातम्या लोकांपर्यंत पोहोचवणे हे आमचे ध्येय आहे.

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही