Share

राधा पाटीलच्या आरोपांवर गौतमी पाटील पहिल्यांदाच बोलली; हसत-हसत दिलं ‘असं’ उत्तर की चर्चा तर होणारच!

राधा पाटीलसोबतच्या वादावर गौतमी पाटीलने अखेर मौन सोडले आहे. “काही लोकांना माझं नाव घेऊन बोलायची सवय झालीये,” असा टोला लगावत तिने आपली भूमिका स्पष्ट केली.

Published On: 

Gautami Patil on Radha Patil: गौतमीने तोडलं मौन! राधाच्या आरोपांना दिलं उत्तर

महाराष्ट्राच्या लावणी विश्वात सध्या थिरकणाऱ्या पावलांपेक्षा दोन नृत्यांगनांमधील ‘कोल्ड वॉर’चीच (Cold War) चर्चा जास्त रंगली आहे. ‘सबसे कातिल’ गौतमी पाटील (Gautami Patil) आणि बिग बॉस फेम राधा पाटील (Radha Patil) यांच्यात सगळं काही आलबेल नाही, हे जगजाहीर आहे. राधाने केलेल्या गंभीर आरोपांवर गौतमीने आजवर मौन बाळगले होते, पण आता एका मुलाखतीत तिने यावर ‘सणसणीत’ भाष्य केलं आहे.

गौतमीला विचारण्यात आलं की, “राधाचं तुझ्यावर प्रेम आहे, असं आम्ही ऐकलंय.” यावर गौतमीने अत्यंत मार्मिक आणि काहीसं उपरोधिक उत्तर दिलं. ती म्हणाली, “हो, तिचं माझ्यावर खूपच जास्त प्रेम आहे. चांगली गोष्ट आहे.” पण पुढे तिने जे सांगितलं, तोच तिचा खरा ‘अटिट्यूड’ होता. गौतमी म्हणाली, “कुणी काहीही बोललं तरी मला फरक पडत नाही. एका कानाने ऐकायचं आणि दुसऱ्या कानाने सोडून द्यायचं, हाच माझा मंत्र आहे.”

Gautami Patil on Radha Patil

हे शीतयुद्ध तेव्हा समोर आलं जेव्हा राधा पाटीलने गौतमीवर अपमानाचा आरोप केला होता. राधाच्या दाव्यानुसार, एका कार्यक्रमात राधाची एन्ट्री होताच प्रेक्षकांनी जल्लोष केला, जे पाहून गौतमीचा पारा चढला. “माझी लेव्हल काय आहे? मला कुणासोबत डान्स करायला लावताय?” असं म्हणत गौतमीने आयोजकांकडे तक्रार केल्याचा गौप्यस्फोट राधाने केला होता. इतकंच नाही तर बिग बॉसमध्ये जातानाही राधाने “मी गौतमीला घाबरत नाही,” असं ओपन चॅलेंज दिलं होतं.

यावर गौतमीने आता स्पष्ट शब्दांत सुनावलं आहे. “लोकांना आजकाल माझं नाव घेऊन काहीही बरळायची सवय झालीये. पण माझे चाहते (Fans) सोशल मीडियावर अशांना चोख उत्तर देतात, याचा मला अभिमान आहे,” असं म्हणत तिने राधाला अप्रत्यक्ष टोला लगावला आहे.

📌 महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही