Share

रोहित पवारांना सुप्रीम कोर्टाचा ‘धक्का’; भर कोर्टात न्यायाधीशांनी झापलं, विचारला ‘हा’ जाब!

महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन प्रकरणात सुप्रीम कोर्टाने रोहित पवारांना फटकारले आहे. “बेकायदेशीर कामे करण्याची हिंमत कशी होते?” असा सवाल करत कोर्टाने याचिका मागे घेण्यास सांगितले.

Published On: 

Rohit Pawar criticizes Sunil Tatkare over Ashok Kharat and Rupali Chakankar resignation case

🕒 1 min read

मुंबई : सत्तेचं राजकारण असो किंवा क्रिकेटचं मैदान, नियम धाब्यावर बसवले की काय होतं, याचा जोरदार प्रत्यय आता आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांना आला आहे. महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या (MCA) निवडणुकीवरून सुरू असलेल्या वादात सुप्रीम कोर्टाने रोहित पवारांना नुसतं फटकारलंच नाही, तर “इतकी बेकायदेशीर कामे करण्याची हिंमत कशी होते?” अशा शब्दांत त्यांची कानउघाडणीही केली आहे.

एमसीए (MCA) निवडणुकीत आपली सत्ता टिकवण्यासाठी रोहित पवारांनी मनमानी पद्धतीने सदस्य संख्या वाढवल्याचा गंभीर आरोप भारताचा माजी क्रिकेटपटू केदार जाधव (Kedar Jadhav) याने केला होता. जाधव यांच्या याचिकेनुसार, पवारांनी सदस्य संख्या १५४ वरून थेट ५७१ वर नेली. विशेष म्हणजे, यात रोहित पवारांची पत्नी कुंती पवार, सासरे सतीश मगर आणि खासदार सुप्रिया सुळे यांची मुलगी रेवती सुळे यांच्यासह त्यांच्या कंपनीतील कर्मचाऱ्यांनाही ‘आजीवन सदस्य’ म्हणून नोंदवण्यात आलं.

Rohit Pawar MCA Case

या विरोधात हायकोर्टाने निवडणुकीला स्थगिती दिली होती. या स्थगितीला आव्हान देण्यासाठी रोहित पवार सुप्रीम कोर्टात पोहोचले, पण तिथे त्यांचा डाव उल्टा पडला. सुप्रीम कोर्टाने सदस्य नोंदणीवर तीव्र आक्षेप घेत विचारलं, “केस मागे घेता की आम्ही डिसमिस करू?”

बीसीसीआयच्या (BCCI) नियमांनुसार घटनादुरुस्तीसाठी कोर्टाची परवानगी लागते, हे माहीत असूनही असा कारभार केल्याने कोर्टाने नाराजी व्यक्त केली. अखेर कोर्टाचा हा आक्रमक पवित्रा पाहून रोहित पवारांना आपली याचिका मागे घ्यावी लागली.

आता या प्रकरणाची पुढील सुनावणी ४ फेब्रुवारीला होणार असून, तोपर्यंत एमसीए निवडणुकीला ब्रेक लागला आहे. केदार जाधव यांनी दिलेल्या कायदेशीर लढ्यामुळे रोहित पवारांच्या अडचणीत मात्र मोठी वाढ झाली आहे.

📌 महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही