🕒 1 min read
एका रात्रीत काय घडू शकतं, याची प्रचिती आज सकाळी बाजार उघडताच आली. अमेरिकेतील एका निर्णयाने इथलं गणितच बदलून टाकलंय. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावरील टॅरिफ (Tariff) कमी करण्याची घोषणा करताच त्याचे जबरदस्त पडसाद आज भारतीय बाजारात उमटले. शेअर बाजाराने (Share Market) उसळी घेतली खरी, पण सर्वसामान्यांच्या काळजाचा ठोका चुकवणारी बातमी आली ती सराफा बाजारातून.
आज वायदा बाजार (Commodity Market) उघडताच चांदीच्या भावात (Silver rates) तब्बल २० हजार रुपयांची विक्रमी वाढ झाली. यामुळे एक किलो चांदीचा दर पाहता पाहता २.५ लाख रुपयांच्या पार गेला आहे. सोन्यानेही (Gold Rate Today) मागे न राहता मोठी झेप घेतली आहे. सोन्याचा भाव (Gold rates) प्रतितोळा ४,५०० रुपयांनी वधारून १ लाख ४८ हजार रुपयांवर पोहोचला आहे. लग्नसराईच्या तोंडावर सोन्या-चांदीचे हे वाढलेले दर ग्राहकांच्या खिशाला चांगलीच कात्री लावणार आहेत.
Gold Silver Rate Today
डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांनी सोमवारी रात्री भारतावरील आयात कर २५ टक्क्यांवरून १८ टक्क्यांपर्यंत कमी करण्याची घोषणा केली. या निर्णयाचे स्वागत करत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी त्यांचे आभार मानले. मात्र, या ‘मैत्री’च्या अध्यायात एक मोठा विरोधाभास लपलाय का? ट्रम्प यांनी दावा केलाय की भारताने रशियाकडून तेल खरेदी थांबवण्याचं आणि अमेरिकन वस्तूंवरचा टॅरिफ शून्य करण्याचं मान्य केलंय.
मात्र, पंतप्रधान मोदींच्या ट्विटमध्ये रशिया किंवा तेल खरेदीबाबत चकार शब्दही नाही. मोदींनी फक्त १८% टॅरिफबद्दल आभार मानले आहेत. त्यामुळे या ‘India US Trade Deal’ मध्ये नक्की काय शिजतंय आणि भारताने खरंच रशियाची साथ सोडली का, हे प्रश्न सध्या अनुत्तरित आहेत.
📌 महत्वाच्या बातम्या
- IND vs PAK : भारत-पाक सामना रद्द होणार? पाकिस्तानच्या ‘त्या’ निर्णयावर बीसीसीआयची पहिली प्रतिक्रिया
- लाडकी बहीण योजनेला दिवंगत अजित पवार यांचे नाव द्या; अमोल मिटकरींची मोठी मागणी
- बावनकुळेंची मोठी घोषणा; राज्यातील फक्त ‘या’ शेतकऱ्यांनाच मिळणार कर्जमाफीचा लाभ













