Share

रोहित शर्मा भावूक; पद्मश्री मिळताच देशवासियांना दिलं ‘ते’ वचन, म्हणाला “अजून थांबलो नाही…”

पद्मश्री पुरस्कार मिळाल्यानंतर रोहित शर्मा भावूक झाला असून, देशासाठी अजूनही ट्रॉफी जिंकण्याचा निर्धार त्याने व्यक्त केला आहे. त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

Published On: 

Rohit Sharma Padma Shri Reaction: हिटमॅन भावूक! देशवासियांना दिलं मोठं वचन

नागपूरच्या गल्लीतून सुरू झालेला प्रवास थेट पद्मश्रीपर्यंत (Padma Shri) पोहोचला, तेव्हा ‘हिटमॅन’लाही अश्रू अनावर झाले. क्रिकेटच्या मैदानात भल्याभल्या गोलंदाजांना घाम फोडणारा रोहित शर्मा (Rohit Sharma) आज मात्र स्वतः भावूक झालेला दिसला. केंद्र सरकारने २५ जानेवारीला त्याला पद्मश्री पुरस्कार जाहीर केला, आणि त्या सन्मानाने भारावून गेलेल्या रोहितने देशवासियांना एक मोठं वचन दिलं आहे. “देशासाठी ट्रॉफी जिंकण्याचा प्रवास अजून संपलेला नाही,” असं सांगत त्याने २०२७ च्या वर्ल्डकपचे जणू रणशिंगच फुंकले आहे.

रोहितचा एक व्हिडिओ जो सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. यात रोहित म्हणतो, “पद्मश्री मिळणं माझ्यासाठी आणि माझ्या कुटुंबासाठी एक अविस्मरणीय क्षण आहे. ज्यांनी माझ्या या प्रवासात साथ दिली, त्या सर्वांचा मी ऋणी आहे.” कसोटी (Test) आणि टी-२० मधून निवृत्ती घेतल्यानंतरही रोहितची भूक अजून शमलेली नाही. “माझ्या देशासाठी अजूनही सामने आणि ट्रॉफी जिंकण्याचे प्रयत्न मी सुरूच ठेवणार आहे,” या त्याच्या वाक्याने चाहत्यांच्या काळजात घर केलं आहे.

Rohit Sharma Padma Shri Reaction

रोहितने २०२४ मध्ये टी-२० वर्ल्डकप आणि २०२५ मध्ये चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकवून देत भारताचा तिरंगा उंचावला. जरी त्याने ७ मे २०२५ ला कसोटीला रामराम ठोकला असला, तरी वनडे क्रिकेटमध्ये तो अजूनही सक्रिय आहे. आता हिटमॅनची नजर २०२७ च्या वनडे वर्ल्डकपवर (World Cup 2027) आहे, हेच त्याच्या या वक्तव्यावरून स्पष्ट होतंय. त्यामुळे ‘पद्मश्री’ रोहित शर्मा आता भारताला आणखी एक वर्ल्डकप देणार का, याकडे संपूर्ण क्रिकेट विश्वाचे डोळे लागले आहेत.

📌 महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही