Share

“मोदींनी ठरवलं तर पाकिस्तान क्रिकेट उद्ध्वस्त होईल”; पाकिस्तानच्या माजी कर्णधाराला धास्ती

भारताच्या पंतप्रधानांनी ठरवले तर पाकिस्तान क्रिकेट उद्ध्वस्त होऊ शकते, अशी भीती रमीझ राजाने व्यक्त केली आहे. पीसीबीचे भारतावरील अवलंबित्व उघड करणारा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.

Published On: 

Ramiz Raja on BCCI: मोदींच्या एका निर्णयाने PCB उद्ध्वस्त होणार? रमीझ राजांची कबुली

🕒 1 min read

एकीकडे पाकिस्तानने टी-20 वर्ल्डकपमध्ये भारताविरुद्ध न खेळण्याची पोकळ धमकी दिली आहे, तर दुसरीकडे खुद्द त्यांच्याच घरातून आता धोक्याची घंटा वाजली आहे. “भारताच्या पंतप्रधानांनी मनात आणलं, तर पाकिस्तान क्रिकेट बोर्ड (PCB) एका झटक्यात रस्त्यावर येईल,” अशी भीती पाकिस्तानचा माजी कर्णधार रमीझ राजा (Ramiz Raja) याने व्यक्त केली आहे. रमीझ राजाचा हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर आगीसारखा व्हायरल होत असून, त्यात त्यांनी पाकिस्तानला आरसा दाखवला आहे.

टी-20 वर्ल्डकप 2026 (T20 World Cup 2026) तोंडावर आला असताना पाकिस्तानने भारताविरुद्ध सामना न खेळण्याचा बालिश हट्ट धरला आहे. बांगलादेशला पाठिंबा देण्याच्या नादात पाकिस्तानने स्वतःच्याच पायावर धोंडा पाडून घेतलाय, असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. कारण रमीझ राजाने आपल्या व्हिडिओत स्पष्ट गणित मांडलं आहे. ते म्हणतात, “पीसीबीला ५० टक्के निधी हा आयसीसीकडून (ICC) मिळतो. आणि आयसीसीला मिळणारा ९० टक्के निधी हा एकट्या भारतातून येतो. त्यामुळे संपूर्ण यंत्रणेवर भारताचा दबदबा आहे.”

Ramiz Raja on BCCI

पुढे बोलताना रमीझ राजाने अत्यंत स्फोटक विधान केलं. ते म्हणाले, “जर उद्या भारताच्या पंतप्रधानांनी ठरवलं की आम्ही पाकिस्तानला निधी देणार नाही, तर पीसीबी उद्ध्वस्त होऊ शकते.” पाकिस्तान क्रिकेट सध्या व्हेंटिलेटरवर आहे आणि ऑक्सिजनचा पुरवठा भारताच्या हातात आहे, अशीच ही स्थिती आहे. त्यामुळे बीसीसीआयशी (BCCI) पंगा घेणं पाकिस्तानला चांगलंच महागात पडू शकतं.

जर पाकिस्तानने हा आडमुठेपणा सोडला नाही, तर त्यांचे आयसीसी सदस्यत्व तर जाईलच, पण कोट्यवधी रुपयांचा फटका बसून बोर्डाला टाळं लावण्याची वेळ येऊ शकते. त्यामुळे आता पाकिस्तान ‘यू-टर्न’ घेणार का, हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.

📌 महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या