Meta Removed Modi Video : फेसबुकवरून पंतप्रधान नरेंद्र मोदींची (PM Narendra Modi) पोस्ट हटवल्याबद्दल ‘मेटा’ने (Meta) माफी मागितली आहे. तांत्रिक त्रुटीमुळे पंतप्रधानांचा व्हिडिओ हटवण्यात आल्याचे मेटाने सांगितले. त्यानंतर ही त्रुटी सुधारण्यात आली आणि हटवलेला व्हिडिओ पुन्हा अपलोड करण्यात आला.
भारतात फेसबुकवर पंतप्रधान नरेंद्र मोदींचा एक व्हिडिओ काही काळासाठी उपलब्ध नव्हता, ज्यामुळे सोशल मीडिया (Social Media) आणि राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली होती. हा व्हिडिओ पाहण्याचा प्रयत्न करताना काही वापरकर्त्यांना ‘कंटेंट उपलब्ध नाही’ (content unavailable) असा संदेश दिसला. मात्र, त्यानंतर काही वेळातच तो व्हिडिओ पुन्हा उपलब्ध करून देण्यात आला. या प्रकरणाबाबत मेटाने आता अधिकृत निवेदन जारी केले आहे. मेटाच्या प्रवक्त्याने सांगितले की, “हा व्हिडिओ चुकीने हटवण्यात आला होता आणि आता तो पुन्हा अपलोड करण्यात आला आहे.” तांत्रिक किंवा कार्यान्वितीविषयक त्रुटीमुळे तो हटवण्यात आला होता आणि आता तो नेहमीप्रमाणे उपलब्ध आहे, असे कंपनीने स्पष्ट केले.
मेटाने काय म्हटले?
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी २३ जुलै २०२६ रोजी फेसबुकवर एक व्हिडिओ शेअर केला होता. लाखो लोकांनी पाहिलेला हा व्हिडिओ मेटाने हटवल्यानंतर अनेक राजकीय नेत्यांनी त्यावर आक्षेप नोंदवला होता. ‘कॉकरोच जनता पार्टी’च्या (Cockroach Janata Party) आंदोलनादरम्यान विद्यार्थ्यांना संदेश देण्यासाठी पंतप्रधान मोदींनी हा व्हिडिओ ‘सेल्फी मोड’मध्ये रेकॉर्ड केला होता. मेटाच्या प्रवक्त्याने सांगितले, “हा व्हिडिओ चुकीने हटवण्यात आला होता आणि आता तो पुन्हा अपलोड करण्यात आला आहे.” मेटाने आपल्या निवेदनात कोणत्याही सरकारी आदेशाचा किंवा कायदेशीर निर्देशाचा उल्लेख केला नाही. मोदींनी सेल्फी मोडमध्ये शूट केलेल्या या व्हिडिओचीही मोठी चर्चा झाली आणि तो सोशल मीडियावर व्हायरल झाला.
📌 महत्वाच्या बातम्या
- राष्ट्रवादी काँग्रेस विलिनीकरण अंतिम टप्प्यात? मोदी-पवार भेटीनंतर दिल्लीत मोठी राजकीय घडामोड
- एकनाथ शिंदे घेणार मंत्र्यांची हजेरी; कामगिरीवरून मोठा निर्णय होण्याची शक्यता
- कृषी विकासाला मोठी चालना! महाराष्ट्राला ₹558 कोटींचा निधी, शेतकऱ्यांना मोठा फायदा
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now











