प्रतिनिधी, 12 ऑक्टोबर: निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात आंदोलनाची हाक देणारे ‘कॉक्रोच जनता पार्टी’चे नेते आशुतोष रांका आणि सौरव दास यांनी पोलिसांच्या कारवाईतून सुटका झाल्यानंतर थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींवर घणाघाती टीका केली आहे. भारताने मोदींसारखा भित्रा पंतप्रधान आजवर पाहिला नसल्याचे सांगत रांका (Ashutosh Ranka) यांनी सरकारवर हल्लाबोल केला.
सुटकेनंतर आजीच्या निधनामुळे अभिजीत दिपके हे हिंगोलीला आपल्या कुटुंबाकडे रवाना झाले. त्यानंतर आशुतोष रांका आणि सौरव दास यांनी पत्रकार परिषद घेऊन मोदी सरकारला लक्ष्य केले. गेल्या दोन दिवसांतील घडामोडींमुळे देशाची बदनामी झाली असून याला केवळ पंतप्रधान मोदी जबाबदार असल्याचा आरोप रांका यांनी केला.
मागील ७२ तासांत आंदोलनाच्या तयारीत असलेल्या हजारो कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेऊन मारहाण केली. तसेच, आम्हाला विमानातून अपहरण (किडनॅप) करण्यात आल्याचा गंभीर दावा रांका यांनी केला आहे. पंतप्रधान मोदी आणि अमित शाह यांनीच ही परिस्थिती चिघळवल्याचे ते म्हणाले.
देशातील सर्वात महान पंतप्रधान होण्याचे स्वप्न पाहणाऱ्या मोदींच्या काळात आपण आणीबाणीसारखी परिस्थिती अनुभवत आहोत, अशी टीका त्यांनी केली. ‘आई-वडिलांकडून १९७५ च्या आणीबाणीच्या कथा ऐकल्या होत्या, ज्यात ट्रेन बंद केल्याचे सांगण्यात आले होते. कालही अनेक ट्रेन रद्द करून लाखो नागरिकांना वेठीस धरण्यात आले. मागील ७२ तासांतील परिस्थितीचे अत्यंत भयंकर परिणाम पाहायला मिळाले,’ असे रांका यांनी स्पष्ट केले.
ही लढाई मुळात निवडणूक आयोग आणि ज्ञानेश कुमार यांच्या विरोधात होती, मात्र ती मोदींनी स्वतःकडे वळवून घेतली आहे. ‘राजाचा जीव पोपटात अडकला असून, ज्ञानेश कुमार यांना वाचवणार असल्याचे मोदींनी स्पष्ट केले आहे’, असा टोला त्यांनी लगावला. लोकशाहीचे रक्षण करण्याची जबाबदारी असलेल्या निवडणूक आयोगाने मोदी आणि भाजपला विजयी करण्यासाठीच काम केल्याचा आरोपही रांका यांनी शेवटी केला.
📌 महत्वाच्या बातम्या
- राज्यात दसऱ्यानंतर परतीचा पाऊस; पंजाबराव डख यांनी जाहीर केली जिल्ह्यांची यादी
- तुकाराम मुंढे MPSC समितीचे सचिव; विद्यार्थ्यांच्या आंदोलनात शिवेंद्रराजेंची मोठी घोषणा
- इंदूरमध्ये टीम इंडियाचा वेस्ट इंडिजवर विजय; २२३ धावा करून कशी फिरवली मॅच?
Ask Maharashtra Desha
आधी या वेबसाइटवरील उपलब्ध बातम्यांमधून उत्तर शोधले जाईल. माहिती अपुरी असल्यास वेबवरील अतिरिक्त स्रोत तपासले जातील.









