Share

अजय देवगणची RSS साठी खास पोस्ट; ‘शतक’चा टीझर शेअर करत म्हणाला, “देशासाठी…”

अजय देवगणने RSS च्या १०० वर्षांच्या प्रवासावरील ‘शतक’ चित्रपटाचा टीझर शेअर करत राष्ट्र उभारणीतील संघाच्या योगदानाचे कौतुक केले आहे.

Published On: 

Ajay Devgn on RSS: 'संघाचे योगदान मोठे'; अजय देवगणने शेअर केला 'शतक'चा टीझर

मुंबई : बॉलिवूड आणि विचारधारा यांचा संबंध तसा जुनाच, पण जेव्हा एखादा बडा स्टार उघडपणे एखाद्या संघटनेच्या कार्याचं कौतुक करतो, तेव्हा चर्चा तर होणारच! असंच काहीसं आता ‘सिंघम’ अजय देवगणच्या (Ajay Devgn) बाबतीत घडलंय. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या (RSS) स्थापनेला १०० वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने एका विशेष चित्रपटाची घोषणा झाली आहे आणि खुद्द अजयने या चित्रपटाचा टीझर शेअर करत संघाच्या कामावर कौतुकाची थाप मारली आहे.

अजय देवगणने आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरून ‘शतक : संघाचे १०० वर्ष’ या चित्रपटाचा टीझर शेअर केला. यावेळी त्याने लिहिले की, “राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला १०० वर्षे पूर्ण झाल्याबद्दल खूप खूप अभिनंदन. राष्ट्र उभारणीत (Nation Building) संघाचं योगदान खूप मोठं आहे.” अजयची ही पोस्ट सध्या सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल होत आहे. या टीझरमध्ये “ये कहानी है उस विचार की, जिसे कई साल कई बार मिटाने की कोशिश की गई…” हे वाक्य लक्ष वेधून घेतं. टीझरमध्ये लोकमान्य टिळक, स्वातंत्र्यवीर सावरकर आणि महात्मा गांधी यांची झलकही पाहायला मिळते.

Ajay Devgn on RSS

हा चित्रपट केवळ इतिहासाचा आढावा नाही, तर संघाचे अनेक अपरिचित पैलू समोर आणण्याचा प्रयत्न आहे. दिग्दर्शक आशिष मल्ल यांच्या मते, समाजात पसरलेले गैरसमज दूर करणे आणि सत्य मांडणे हेच या सिनेमाचे उद्दिष्ट आहे. १८७५ ते १९५० या काळात सुरू झालेल्या अनेक चळवळींपैकी संघ ही अशी संघटना आहे जी आजही अखंडपणे कार्यरत आहे. त्यामुळेच ‘ना रुके, ना थके, ना झुके’ ही टॅगलाईन या सिनेमाला देण्यात आली आहे. आता हा चित्रपट प्रेक्षकांच्या पसंतीस किती उतरतो, हे पाहणं औत्सुक्याचं ठरेल.

📌 महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही