Share

लाडक्या बहिणींची दिवाळी! आता थेट ४५०० रुपये खात्यात जमा होणार; सरकारचा मोठा निर्णय

लाडकी बहीण योजनेअंतर्गत ई-केवायसीमुळे रखडलेले तीन महिन्यांचे हप्ते आता एकत्र मिळणार असून, पात्र महिलांच्या खात्यात ४५०० रुपये जमा केले जाणार आहेत.

Published On: 

Ladki Bahin Yojana Update: खात्यात ४५०० रुपये जमा होणार! आनंदाची बातमी

तुमच्या खात्यात ‘लाडकी बहीण’चे पैसे यायचे थांबलेत का? मग ही बातमी तुमच्यासाठीच आहे. गेल्या काही दिवसांपासून ई-केवायसीच्या तांत्रिक अडचणींमुळे अनेक महिलांचे हप्ते रखडले होते, पण आता सरकारने यावर तोडगा काढला असून लाडक्या बहिणींना (Ladki Bahin Yojana) मोठा दिलासा मिळणार आहे. महिला व बालविकास विभागाने दिलेल्या माहितीनुसार, ज्यांचे पैसे अडकले होते, त्यांना आता मागील तीन महिन्यांचे पैसे एकत्र दिले जाणार आहेत.

विधानसभा निवडणुकीत महायुती सरकारला या योजनेचा मोठा फायदा झाला, पण त्यानंतर अनेक महिलांचे ई-केवायसी (e-KYC) अपडेट नसल्याने नोव्हेंबर आणि डिसेंबरचे पैसे जमा झाले नव्हते. यामुळे महिलावर्गात संताप होता, काही ठिकाणी तर महिलांनी रस्त्यावर उतरून नाराजीही व्यक्त केली होती. या पार्श्वभूमीवर सरकारने पडताळणीचे आदेश दिले होते. आता ही प्रक्रिया पूर्ण होत आली असून, ज्यांचे नोव्हेंबर, डिसेंबर आणि जानेवारीचे हप्ते थकले आहेत, त्यांच्या खात्यात थेट ४५०० रुपये जमा होणार आहेत.

Ladki Bahin Yojana Update

मात्र, यात एक महत्त्वाचा मुद्दा लक्षात घ्यायला हवा. हा नियम सर्वांसाठी नाही. ज्या महिलांना यापूर्वीच नोव्हेंबर आणि डिसेंबरचे पैसे मिळाले आहेत, त्यांना फक्त जानेवारी महिन्याचा १५०० रुपयांचा हप्ता मिळेल. पण ज्यांचे पैसे तांत्रिक कारणामुळे अडकले होते, त्यांना तिन्ही महिन्यांचे पैसे एकरकमी मिळतील.

दरम्यान, लाडक्या बहिणींना २१०० रुपये कधी मिळणार? याचीही चर्चा जोरात आहे. मंत्री चंद्रशेखर बावनकुळे आणि उदय सामंत यांनी दिलेल्या संकेतानुसार, भविष्यात ही रक्कम वाढण्याची शक्यता आहे. तसं झाल्यास महागाईच्या काळात महिलांना हा खूप मोठा आधार ठरेल.

📌 महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही