Share

संसदेच्या पायऱ्यांवर पुन्हा जुळली ‘केमिस्ट्री’; संसदेत एकत्र दिसले कंगना रनौत-चिराग पासवान

एनडीएच्या बैठकीत कंगना रनौत आणि चिराग पासवान यांची भेट झाली असून, त्यांचा हसतानाचा आणि गप्पा मारतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

Published On: 

Kangana Ranaut Chirag Paswan Video: संसदेत पुन्हा दिसली जोडी!

‘जुनं ते सोनं’ असं म्हणतात, पण जेव्हा दोन जुने सहकारी वर्षांनंतर अचानक आणि ते ही संसदेसारख्या ठिकाणी भेटतात, तेव्हा त्या भेटीची चर्चा तर होणारच! असाच काहीसा प्रत्यय सध्या दिल्लीच्या राजकारणात आलाय. मंगळवारी एनडीएच्या बैठकीपूर्वी एक असं दृश्य दिसलं, ज्याने नेटकऱ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. भाजप खासदार कंगना रनौत (Kangana Ranaut) आणि केंद्रीय मंत्री चिराग पासवान (Chirag Paswan) समोरासमोर आले आणि उपस्थितांच्या भुवया उंचावल्या.

मंगळवारी दिल्लीत एनडीएच्या संसदीय दलाची बैठक पार पडली. या गंभीर माहोलमध्येही कंगना आणि चिराग यांच्यातील दिलखुलास संवादाने सर्वांचे लक्ष वेधले. यांचा एक विडिओ (Video) सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे, ज्यामध्ये दोघेही हसतमुखाने एकमेकांचे स्वागत करताना आणि गप्पा मारताना दिसत आहेत.

Kangana Ranaut Chirag Paswan 

तुम्हाला आठवत असेल, या दोघांनी ‘Miley Naa Miley Hum’ या चित्रपटात एकत्र काम केलं होतं. नियतीचा खेळ बघा, तेव्हा रुपेरी पडद्यावर एकत्र दिसलेली ही जोडी आज देशाच्या संसदेत ‘खासदार’ म्हणून वावरताना दिसतेय.

चिराग पासवान यांनी यापूर्वीच कंगनाच्या स्वभावाचे कौतुक केले होते. एका जुन्या मुलाखतीत ते म्हणाले होते की, “कंगना अनेकदा ‘पॉलिटिकली करेक्ट’ नसते, पण ती जे काही बोलते ते मनापासून आणि स्पष्ट बोलते.” त्यांची हीच स्पष्टवादिता चिराग यांना भावते. आता हा नवीन व्हिडिओ समोर आल्यानंतर सोशल मीडियावर कमेंट्सचा पाऊस पडतोय. कोणी त्यांना ‘पॉवरफुल लीडर्स’ म्हणतंय, तर कोणी हार्ट इमोजी शेअर करत या जुन्या जोडीवर प्रेमाचा वर्षाव करतंय. राजकारणाच्या आखाड्यात या ‘Old Friends’ ची ही भेट सध्या चांगलीच ‘Trending’ आहे.

📌 महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही