Share

सोन्याच्या भावात वाढ; एका दिवसात चांदी १० हजारांनी महागली, सोन्यानेही ओलांडली सीमा!

डोनाल्ड ट्रम्प यांच्या आयात कर कमी करण्याच्या निर्णयानंतर सोन्या-चांदीच्या दरात मोठी वाढ झाली असून, चांदी एका दिवसात १० हजारांनी महागली आहे.

Published On: 

Gold Rate Declines as prices drop in Mumbai and Pune jewelry markets

तुम्ही जर आज सोनं-चांदी खरेदी करायला जात असाल, तर तुमच्या खिशाला मोठी कात्री लागणार आहे. शेअर मार्केट असो वा सराफा बाजार, इथे कधी काय होईल याचा नेम नाही, याचा प्रत्यय पुन्हा एकदा आलाय. मागील तीन-चार दिवसांपासून दिलासादायक घसरण पाहायला मिळत असतानाच, अचानक सोन्या-चांदीच्या दराने (Gold Rate Today) मोठी उडी घेतली आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावरील आयात कर (Import Tax) कमी करण्याची घोषणा करताच, भारतीय सराफा बाजारात मोठी ‘खळबळ’ उडाली आहे.

गेल्या २४ तासांत सोन्या-चांदीच्या दरात (Gold Silver Rates) मोठे बदल झाले आहेत. काल १ लाख ५३ हजार ८२० रुपयांवर असणारे २४ कॅरेट सोने आज थेट १ लाख ५९ हजार ६५० रुपये प्रति दहा ग्रॅमवर पोहोचले आहे. म्हणजेच, एका दिवसात सोन्याच्या दरात तब्बल ५,८२० रुपयांची वाढ झाली आहे. सोन्यापेक्षा चांदीचा भाव जास्त कडाडला आहे. २४ तासांत चांदीच्या दरात १०,२८० रुपयांची वाढ झाली असून, आजचा दर २ लाख ७८ हजार १७० रुपये प्रति किलो झाला आहे.

Gold Rate Today

काही दिवसांपूर्वी १ लाख ८० हजारांवर गेलेलं सोनं १ लाख ४५ हजारांपर्यंत खाली आलं होतं, त्यामुळे ग्राहकांमध्ये आनंदाचे वातावरण होते. मात्र, जागतिक पातळीवर डॉलरवरील विश्वास कमी झाल्याने आणि ट्रम्प यांच्या निर्णयामुळे गुंतवणूकदार पुन्हा सोन्याकडे वळले आहेत. यामुळे जळगावच्या (Jalgaon Gold Market) सुवर्ण बाजारातही दरांमध्ये अस्थिरता दिसून येत आहे. “पुढील काळात हे दर पुन्हा विक्रमी उच्चांक गाठू शकतात,” असा अंदाज सुवर्ण व्यावसायिकांनी व्यक्त केला आहे. त्यामुळे सध्या कमी झालेल्या दराचा फायदा घेण्यासाठी जळगावच्या सराफा बाजारात ग्राहकांची एकच गर्दी होत आहे.

📌 महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही