Share

मुंबईत राहून मराठी येत नाही? ७२२ रिक्षाचालकांना नोटीस, सोनम कपूरची ‘ती’ एका शब्दाची प्रतिक्रिया

मुंबईत मराठी भाषा न येणाऱ्या ७२२ रिक्षा-टॅक्सी चालकांना परिवहन विभागाने नोटीस बजावली आहे. यावर आता अभिनेत्री सोनम कपूरने एका शब्दात आपली प्रतिक्रिया दिली आहे.

Published On: 

Sonam Kapoor reacts to Mumbai auto drivers strike over Marathi language test notice

Sonam Kapoor On Marathi Language Test: मुंबईत राहून मराठी येत नाही? मग आता थेट कारवाईला सामोरं जावं लागेल! महाराष्ट्र राज्य परिवहन विभागाने व्यावसायिक वाहन चालकांसाठी मराठी भाषेचं ज्ञान बंधनकारक केलं आहे.

त्यासाठी १५ ऑगस्टची डेडलाईनही देण्यात आली होती. पण, मुदत संपूनही अनेक चालकांना मराठी येत नसल्याचं तपासणीतून उघड झालंय. याच गदारोळात आता अभिनेत्री सोनम कपूरची एका शब्दाची प्रतिक्रिया चांगलीच चर्चेत आली आहे.

Marathi Language Test: ७२२ चालकांना नोटीस, मुंबईत रिक्षाचालकांचा संप

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, परिवहन विभागाने २० ऑगस्टपासून कडक तपासणी सुरू केली. राज्यभरात ५,२११ चालकांची चाचणी घेण्यात आली. यातील एकट्या मुंबई महानगर प्रदेशात (MMR) ३,९४२ चालकांची तपासणी करण्यात आली.

यात तब्बल ७२२ चालकांना मराठीचा एक शब्दही बोलता आला नाही. त्यामुळेच… या सर्व चालकांना आता थेट नोटीस बजावण्यात आली आहे. या कारवाईमुळे चालक वर्गात मोठी खळबळ उडाली आहे.

दुसरीकडे… या सक्तीविरोधात रिक्षाचालक चांगलेच आक्रमक झाले आहेत. त्यांनी सोमवारी मुंबईत सलग तीन दिवसांचा संप पुकारला. कांदिवली लिंक रोडवर काही चालकांनी रास्ता रोकोही केला.

कमी वेळेत मराठी कसं शिकायचं?

हा प्रश्न वयस्कर चालकांना सतावतोय. दंडात्मक कारवाई आणि आर्थिक भुर्दंड बसण्याच्या भीतीने हे चालक रस्त्यावर उतरले आहेत. याच मुद्द्यावर पत्रकाराने सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली होती. त्यावर सोनम कपूरने फक्त ‘Huh’ (हह) अशी उद्विग्न प्रतिक्रिया दिली. या एका शब्दाने आता इंटरनेटवर चर्चांना उधाण आलंय.

थोडक्यात सांगायचं तर… सोनम सध्या राजकीय आणि सामाजिक घडामोडींवर लक्ष ठेवून असली तरी, ती सिल्व्हर स्क्रीनपासून दूरच आहे. तिने उद्योजक आनंद आहुजासोबत २०१८ मध्ये लग्नगाठ बांधली. ऑगस्ट २०२२ मध्ये तिने ‘वायू’ या पहिल्या मुलाला जन्म दिला. त्यानंतर आता २९ मार्च २०२६ रोजी तिच्या पोटी ‘रुद्रलोक’ या दुसऱ्या मुलाचा जन्म झाला. सध्या ती तिच्या कुटुंबासोबत वेळ घालवत आहे. अलीकडेच, ६ जुलै रोजी बहीण अंशुला कपूरच्या लग्नात ती स्पॉट झाली होती.

तिच्या कामाबद्दल बोलायचं तर, ७ जुलै २०२३ रोजी आलेला ‘ब्लाईंड’ हा तिचा शेवटचा चित्रपट होता. सुजॉय घोषने या चित्रपटाची निर्मिती केली होती. यात पूरब कोहली, विनय पाठक आणि लिलेट दुबे यांच्याही महत्त्वाच्या भूमिका होत्या. आता ती ‘बॅटल फॉर बिट्टोरा’मधून पुनरागमन करेल, अशी जोरदार चर्चा आहे. मात्र, याबाबत अद्याप अधिकृत दुजोरा मिळालेला नाही.

📌 महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही