Share

‘मी एकनाथ शिंदेंना खूप मानते…’; गौतमी पाटीलचा जलवा, तर दुसरीकडे शिंदेंनी केली ‘ही’ मोठी घोषणा

गौतमी पाटीलने ऐरोलीतील दहीहंडीत एकनाथ शिंदेंचे कौतुक केले, तर दुसरीकडे शिंदेंनी पुढील वर्षीपासून दहीहंडीला सुट्टी देण्याची मोठी घोषणा केली आहे.

Published On: 

Gautami Patil performs dance at Airoli Dahi Handi Navi Mumbai

Gautami Patil : बॉलिवूड तारकांच्या उपस्थितीने रंगणाऱ्या दहीहंडीचा उत्सवात आता प्रसिद्ध नृत्यांगना गौतमी पाटीलनेही आपली वेगळीच क्रेझ निर्माण केली आहे. ऐरोलीतील शिवसेनेच्या दहीहंडीत गौतमीने आपल्या नृत्याने नवी मुंबईकरांना अक्षरशः वेड लावलं. पण, या सगळ्यात सर्वाधिक चर्चा रंगली ती गौतमीने राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबद्दल केलेल्या एका खास वक्तव्याची आणि शिंदेंनी केलेल्या एका मोठ्या घोषणेची.

ऐरोली येथील शिवसेनेच्या दहीहंडी उत्सवात गौतमीने ‘पाटलांचा बैलगाडा’ आणि इतर अनेक गाण्यांवर ठेका धरला. त्यावेळी तरुणाईचा उत्साह ओसंडून वाहत होता. हा उत्सव म्हणजे आपल्या घरचाच कार्यक्रम असल्याचं सांगत तिने आयोजकांचे आणि चाहत्यांचे आभार मानले. विशेष म्हणजे, यावेळी बोलताना गौतमीने थेट एकनाथ शिंदे यांच्या नावाचा उल्लेख केला.

“मी एकनाथ शिंदे यांना खूप मानते. त्यांनी नेहमीच मराठी सण आणि संस्कृती जपण्याचं आवाहन केलं आहे, आणि त्यांच्याच आवाहनाला अनुसरून मी काम करत आहे,” असं ती म्हणाली. तसेच, गोविंदांनी स्वतःची काळजी घेत सुरक्षितपणे थर लावावेत, असा सल्लाही तिने दिला.

Gautami Patil performs dance at Dahi Handi

‘एक बार कमिटमेंट कर दी…’; पुढच्या वर्षी दहीहंडीला सुट्टी देण्याची शिंदेंची घोषणा

दुसरीकडे, दहीहंडी उत्सवाच्या निमित्ताने एकनाथ शिंदे यांनीही तरुणाईचं भरभरून कौतुक केलं. “तरुणाईमुळेच आज आपली संस्कृती आणि परंपरा टिकून आहे. स्वर्गीय आनंद दिघे यांनी बाळासाहेबांच्या आशीर्वादाने ठाण्यात पहिली दहीहंडी सुरू केली होती,” अशी आठवण त्यांनी सांगितली. मुख्यमंत्रिपदाच्या काळात कोरोनाचे निर्बंध हटवून आपणच गोविंदांना विम्याचं संरक्षण आणि साहसी खेळाचा दर्जा दिल्याची उजळणीही त्यांनी आवर्जून केली. “मी आतापर्यंत अशा अनेक मोठ्या हंड्या फोडल्या आहेत,” असा राजकीय टोलाही त्यांनी विरोधकांना लगावला.

यावेळी शिंदेंनी गोविंदांना एक मोठं गिफ्ट दिलं आहे. “पुढील वर्षीपासून दहीहंडीला अधिकृत सुट्टी जाहीर करूया, ‘एक बार मैने कमिटमेंट कर दी तो मै खुद की भी नही सुनता’,” असा फिल्मी डायलॉग मारत त्यांनी मोठी घोषणा केली. याशिवाय, मुंबईहून ठाण्याला जाणारी मेट्रो आता थेट ऐरोलीला जोडली जाईल, ज्यामुळे नवी मुंबईकरांचा मोठा फायदा होईल, अशी महत्त्वपूर्ण माहितीही शिंदेंनी यावेळी दिली.

📌 महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही