📰
आमचं App डाउनलोड करा! ⭐⭐⭐⭐⭐
सर्वात आधी ताज्या बातम्या मिळवा — Free!
Download करा
Share

गोविंदा दिवाळखोरीत? घरसुद्धा गहाण, पैशांसाठी करतोय लग्झरी कार सोडून टॅक्सीने प्रवास? मॅनेजर म्हणाला…

गोविंदा खरंच दिवाळखोरीत निघाला आहे का? साध्या टॅक्सीने प्रवास आणि शाळांमध्ये डान्स करण्यामागचं सत्य काय? मॅनेजरने दिली मोठी अपडेट.

Published On: 

Govinda Bankrupt Rumors: गोविंदा खरंच कंगाल झालाय का? मॅनेजरचा मोठा खुलासा!

🕒 1 min read

बॉलिवूडचा ‘हिरो नंबर वन’ खरोखरच कंगाल झालाय का? सध्या सोशल मीडियावर आणि गॉसिपच्या गलियारोंमध्ये एकच चर्चा रंगलीये. कधी पत्नीसोबतच्या घटस्फोटाच्या वावड्या तर कधी आर्थिक परिस्थिती कोलमडल्याच्या बातम्या. त्यातच नुकताच गोविंदाचा (Actor Govinda) उत्तर प्रदेशात एका साध्या टॅक्सीतून प्रवास करतानाचा व्हिडीओ व्हायरल झाला आणि चाहत्यांच्या काळजात धस्स झालं. बीएमडब्ल्यू, मर्सिडीज फिरवणारा स्टार आज टॅक्सीतून का फिरतोय? शाळा-कॉलेजमध्ये जाऊन डान्स करण्याची वेळ त्याच्यावर का आली? या सर्व प्रश्नांवर आता गोविंदाचे मॅनेजर शशी सिन्हा यांनी मौन सोडलं आहे.

सोशल मीडियावर असा दावा केला जात होता की, गोविंदाची आर्थिक परिस्थिती इतकी खालावली आहे की त्याला पैशांसाठी लहान-सहान कार्यक्रमात नाचावं लागतंय. मात्र, या चर्चांमध्ये तथ्य नसल्याचं मॅनेजरने स्पष्ट केलंय. शशी सिन्हा यांनी सांगितलं की, “गोविंदाकडे एकच नाही तर अनेक लग्झरी गाड्या आहेत. तो दिवाळखोर आहे आणि भीक मागतोय, हे म्हणणं पूर्णपणे मूर्खपणाचं आहे.” परफॉर्म करणं हा त्याचा व्यवसाय आहे, त्याचा गरिबीशी संबंध जोडणं चुकीचं असल्याचं त्यांनी ठणकावून सांगितलं.

Govinda Bankrupt Rumors

ज्या टॅक्सीच्या व्हिडिओवरून ही चर्चा सुरू झाली, त्याबद्दल सांगताना सिन्हा म्हणाले की, विमानतळाच्या आत खाजगी वाहनांना परवानगी नसल्याने त्यांना टॅक्सीने प्रवास करावा लागला. भूतकाळात कर्जासाठी घर गहाण ठेवल्याच्या बातम्या होत्या, पण “ते कर्ज अभिनेत्याने कधीच फेडलं आहे,” असंही त्यांनी स्पष्ट केलं.

विशेष म्हणजे, गोविंदाला आजही इंडस्ट्रीत मोठी मागणी आहे. मॅनेजरच्या माहितीनुसार, “गोविंदाने नुकत्याच कोट्यवधी रुपयांच्या ऑफर्स नाकारल्या आहेत.” त्याला स्क्रिप्ट आवडली नाही म्हणून त्याने काम केलं नाही, पण याचा अर्थ काम मिळत नाही असा होत नाही. लवकरच गोविंदाच्या चाहत्यांसाठी एक मोठी घोषणा (Big Announcement) होणार असल्याचे संकेतही त्यांनी दिले आहेत. त्यामुळे ‘चिची’च्या चाहत्यांनी तरी या अफवांवर विश्वास ठेवू नये, हेच यातून स्पष्ट होतंय.

📌 महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!