Share

एकनाथ खडसे यांच्या विरोधात महाराष्ट्रातील भाजपचे नेते नाराज; खडसेंनी पक्ष प्रवेशविनाच घेतली भाजपची सूत्रे हाती!

Eknath khadse । लोकसभा निवडणुक तोंडावर असताना शरद पवारांची साथ सोडून ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे पुन्हा भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. काही दिवसांपूर्वीच त्यांनी याबाबत घोषणा केली होती. भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचं जाहीर केलं असलं तरी एकनाथ खडसें चा अजूनही पक्षप्रवेश झालेला नाही. मात्र, आता पक्ष प्रवेश झालेला नसताना एकनाथ खडसे यावल येथील भाजपच्या प्रचार कार्यालयात … Read more

Published On: 

Eknath khadse । लोकसभा निवडणुक तोंडावर असताना शरद पवारांची साथ सोडून ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे पुन्हा भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. काही दिवसांपूर्वीच त्यांनी याबाबत घोषणा केली होती. भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचं जाहीर केलं असलं तरी एकनाथ खडसें चा अजूनही पक्षप्रवेश झालेला नाही.

मात्र, आता पक्ष प्रवेश झालेला नसताना एकनाथ खडसे यावल येथील भाजपच्या प्रचार कार्यालयात गेले होते. तिथे त्यांनी लोकसभेच्या प्रचाराबाबत भाजपच्या कार्यकर्त्यांना सूचनाही केल्या.

दरम्यान, अजुनही पक्षात प्रवेश केला नसताना खडसेंच्या या बैठकीमुळे भाजपचे स्थानिक कार्यकर्ते मात्र चांगलेच गोंधळात पडले आहेत. माझ्या पक्षप्रवेशाची केवळ औपचारिकताच बाकी असून प्रवेश झालेला असल्याचं भाजपच्या वरिष्ठांनी सांगितलं आहे. त्यामुळे मी प्रचारात उतरलो आहे, असं खडसेंनी यावेळी सांगितलं. त्यांनी यावल येथील भाजप प्रचार कार्यालयास भेट दिली, यावेळी माध्यमांशी खडसे बोलले.

एकनाथ खडसेंचा भाजप मध्ये पक्षप्रवेश झालेला नसताना अचानक पक्षाच्या संपर्क कार्यालयात खडसे आल्याने शहर आणि तालुक्यातील भाजपचे काही पदाधिकारी मात्र चक्रावले होते. शहरात विविध भागात प्रचार करताना भाजप पदाधिकारी खडसेंच्या आदेशाचे पालन करताना दिसले.

माध्यमांशी बोलताना खडसे म्हणाले, की ‘भाजपचे वरिष्ठ नेते विनोद तावडे, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना माझा प्रवेश कधी जाहीर करणार असं विचारलं. त्यावर ते म्हणाले , की प्रवेशाची तारीख कळवतो, तुमचा प्रवेश झालेलाच आहे. तुम्हाला बैठका घेण्यास आणि पक्षाचा प्रचार करण्यास हरकत नसल्याचं त्यांनी सांगीतले. त्यानुसार मी गेल्या दोन दिवसांपासून प्रचारात सक्रिय झालोलो आहे.

काही दिवसांपूर्वी खडसे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचा आपल्या पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा दिला. मात्र अजूनही त्यांचा भाजप पक्षप्रवेश अजूनही रखडला आहे. एकनाथ खडसे यांच्या विरोधात महाराष्ट्रातील भाजपचे नेते नाराज आहेत. त्यामुळेच खडसेंचा पक्ष प्रवेश लांबणीवर पडलाचे बोलले जाते.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही