Share

वाघेरे कुटुंबीयच श्रीरंग बारणेंना प्रचंड मताने विजयी करणार; तरुण नेत्याचा गौप्यस्फोट

रवी वाघमारे ( प्रतिनिधी ) Vishwajit Barne vs Sanjog Waghere – मावळ लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार विद्यमान खासदार श्रीरंग बारणे विरुद्ध महाविकास आघाडीचे उमेदवार संजोग वाघेरे यांच्यात प्रमुख लढत होणार आहे. मावळ लोकसभेत एकूण 33 उमेदवार निवडणूकीच्या रिंगणात आहेत.  मावळ लोकसभा मतदारसंघातून बारणे यांना सर्वाधिक मताधिक्य मिळवून देण्यासाठी कार्यकर्ते जीवाचे रान करत असल्याचे चित्र आहे. … Read more

Published On: 

रवी वाघमारे ( प्रतिनिधी ) Vishwajit Barne vs Sanjog Waghere – मावळ लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार विद्यमान खासदार श्रीरंग बारणे विरुद्ध महाविकास आघाडीचे उमेदवार संजोग वाघेरे यांच्यात प्रमुख लढत होणार आहे. मावळ लोकसभेत एकूण 33 उमेदवार निवडणूकीच्या रिंगणात आहेत.  मावळ लोकसभा मतदारसंघातून बारणे यांना सर्वाधिक मताधिक्य मिळवून देण्यासाठी कार्यकर्ते जीवाचे रान करत असल्याचे चित्र आहे.

तर, दुसरीकडे महाविकास आघाडीचे उमेदवार संजोग वाघेरे हे मात्र पहिल्यांदा लोकसभा निवडणूक लढवत आहेत. या आधी वाघेरे यांनी पिंपरी-चिंचवड महानगर पालिकेचे महापौर पद आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष पद भूषविले होते. राष्ट्रवादी फुटीनंतर वाघेरे हे अजित पवार गटात सामील झाले होते. परंतु, अजित पवार गटाकडून लोकसभा निवडणूक लढवता येणार नसल्याचे लक्षात येताच, अजित पवारांना सोडून वाघेरे हे उद्धव ठाकरे गटात सामील झाले आहे. संजोग वाघेरे यांनी ठाकरे गटाकडून उमेदवारी पदरात पाडून घेतली आहे.

दरम्यान, श्रीरंग बारणे यांचे सुपुत्र विश्वजीत बारणे यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे. ते म्हणाले की,” आमच्या ज्या मोठी काकी आहे, त्यांचे माहेरघर वाघेरे यांचे आहे. आणि आमचे पिंपरी गावातील अनेक नातेसंबंध आहेत. त्या अनुषंगाने ५० टक्के वाघेरे हे आमचे काम करत आहे. त्यामुळे नात्यागोत्याचे राजकारण पिंपरी शहराला नवीन नाही. ४० वर्षांपासून बारणे घराणे या शहराच्या विकासासाठी काम करतेय. हि निवडणूक ग्रामपंचायत किंवा महानगरपालिकेची नाही, हि निवडणूक देश कोणच्या ताब्यात देणार आहोत त्याची हि निवडणूक आहे. पिंपरी-चिंचवड शहरात नात्यागोत्याचे राजकारण असले तरी ५० टक्के वाघेरे घराणे आमचे काम करत असल्याचा दावा विश्वजीत बारणे यांनी केला आहे.

४ जूनला आम्हीच गुलाल उधळणार आहोत, विक्रमी मताने विजयी होण्याचा विश्वास असल्याचा सांगत लाखोंच्या फरकाने विजयी होणार असल्याचे विश्वजीत बारणे यांनी सांगितले.

महत्वाच्या बातम्या

 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही