राष्ट्रवादीच्या विलीनीकरणावर छगन भुजबळांचे थेट विधान; म्हणाले, ‘मर्जरच्या खेळाचे नियम…’

राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलीनीकरणाच्या चर्चेवर मंत्री छगन भुजबळांनी भाष्य केले आहे. हा प्रश्न अत्यंत जटिल असून सर्वांनी एकत्रित चर्चा करण्याची आवश्यकता असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

Published On: 

Chhagan Bhujbal speaking on NCP merger discussion

नाशिक, 13 नोव्हेंबर: राज्याच्या राजकारणात सध्या दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांच्या विलीनीकरणाची जोरदार चर्चा सुरू आहे. यावर राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी भाष्य करत, राज्यात ‘मर्जर-मर्जर’चा खेळ सुरू असल्याचे म्हटले आहे. उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार या आम्हा सर्वांना विश्वासात घेऊन योग्य वेळी निर्णय घेतील, असे भुजबळ यांनी स्पष्ट केले.

सध्या कोण कोणाला भेटत आहे आणि काय चर्चा होत आहे, हे काहीच समजत नसल्याचे भुजबळ म्हणाले. या विलीनीकरणाच्या खेळाचे नियम ठरवायला हवेत, असे सांगत त्यांनी दोन्ही बाजूंनी सांघिक खेळ होण्याची अपेक्षा व्यक्त केली. आमच्यातील एखादा जातो आणि चर्चा करतो, हे क्रिकेट सुरू असल्याचे सांगत त्यांनी तुटक-तुटक चर्चेऐवजी सर्वांनी एकत्रित चर्चा करण्याची आवश्यकता असल्याचे नमूद केले.

दोन्ही राष्ट्रवादी किंवा दोन्ही शिवसेना एकत्र आल्यास आपल्याला आनंदच होईल, असे भुजबळ यांनी सांगितले. मात्र, हा प्रश्न अत्यंत जटिल असल्याचे ते म्हणाले. अजितदादा गेल्यानंतर परिस्थिती पूर्णपणे बदलली असून, ते असते तर सर्वांना सांभाळून पुढे गेले असते, असेही त्यांनी म्हटले. सध्या आपला गट ‘एनडीए’सोबत आहे, तर शरद पवार यांचा पक्ष ‘इंडिया’ आघाडीसोबत आहे, त्यामुळे एकत्र आल्यावर कुणासोबत राहायचे हा मोठा प्रश्न असल्याचे भुजबळ यांनी स्पष्ट केले. भाजप आणि मुख्यमंत्र्यांना दूर ठेवून किंवा त्यांच्या संमतीशिवाय कोणतेही पाऊल टाकता येणार नसल्याचे त्यांनी ठामपणे सांगितले.

शरद पवार यांच्यासोबतच्या संबंधांवर बोलताना भुजबळ यांनी आपल्या आयुष्यात बाळासाहेब ठाकरे आणि शरद पवार हे दोन मोठे मार्गदर्शक असल्याचे सांगितले. पवार हे राज्यातील सर्वात ज्येष्ठ व परिपक्व नेते असून, राजकारणात मतभेद असले तरी ते नातेसंबंध जपतात, असे भुजबळ म्हणाले. आजही आपण त्यांना दिवाळीच्या शुभेच्छा देतो, असे सांगतानाच, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष वाढवण्यात पवार साहेब आणि आपला सिंहाचा वाटा होता व बाकीचे लोक नंतर आल्याची भावना भुजबळ यांनी व्यक्त केली.

📌 महत्वाच्या बातम्या

AI ASSISTANT

Ask Maharashtra Desha

आधी या वेबसाइटवरील उपलब्ध बातम्यांमधून उत्तर शोधले जाईल. माहिती अपुरी असल्यास वेबवरील अतिरिक्त स्रोत तपासले जातील.

500 अक्षरांपर्यंत
MHD News

सत्य, निष्पक्षता आणि नव्या दृष्टिकोनाची कास धरत, 'महाराष्ट्र देशा' प्रत्येक घटनेचं प्रामाणिक रिपोर्टिंग करत आले आहे. अचूक आणि वेगवान बातम्या लोकांपर्यंत पोहोचवणे हे आमचे ध्येय आहे.

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही